
मराठा क्रांती मोर्चाचे मनोज जरांगे हे कायमच चर्चेत असतात. त्यांच्या अशा चर्चेत असण्यामुळे महाराष्ट्रातील सर्वांनाच ते माहित झाले आहेत. बीडच्या सिरसमार्ग येथे अखंड हरिनाम नारळी सप्ताह चालू असून पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे हे एकाच मंचावर आले होते. यावेळी हॉस्पिटलमधून आल्यामुळे पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
मनोज जरांगे यांनी केली नवीन घोषणा -
राज्य सरकारने तात्काळ सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर विधानसभेच्या सर्व जागा लढवू, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. आम्हाला फक्त आरक्षण हवे आहे, आमचा कोणालाही विरोध नाही. आम्हाला फक्त आरक्षण हवे आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, त्या नेत्यांचा कार्यक्रम मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
मनोज जरंगे पुढे म्हणतात की, लोकसभेला जरी आम्ही निवडणूक लढवणार नसलो तरी विधानसभेला मात्र आम्ही मराठा समाजाचे उमेदवार उभे करणार आहोत. यावेळी आम्ही आधीपासूनच तयारी केली असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये सरकारने मराठा समाजाच्या एकीची धास्ती घेतली असून पाच टप्प्यात निवडणुका घेतल्या जात आहेत. तर नरेंद्र मोदींना देखील स्वतःचा प्रचार सोडून आता इतर नेत्यांचा देखील प्रचार करावा लागत आहे
नरेंद्र मोदींना प्रत्येक टप्यात महाराष्ट्रात यावे लागतंय -
मनोज जरांगे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. जरंगे म्हणतात की, नरेंद्र मोदी यांना त्यांचा प्रचार सोडून महाराष्ट्रात यावे लागत आहे. मराठा समाजाची भीती असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात यावं लागत असल्याची भीती नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
आणखी वाचा -
शरद पवारांचा 'निष्ठावंत' लागणार देवेंद्र फडणवीसांच्या गळाला? सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीला बसणार मोठा धक्का
कोण आहेत उज्ज्वल निकम, मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून तिकीट जाहीर