मनोज जरांगे: महिनाभर माझ्या घरी भाजी नव्हती

मनोज जरांगे: महिनाभर माझ्या घरी भाजी नव्हती

Published : Oct 02, 2026, 06:02 PM IST

बीडच्या गेवराई तालुक्यातील साठेवाडी येथे बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यासह सहकाऱ्यांवर होत असलेल्या आरोपांना उत्तर दिलं. एक महिना उपोषणात असताना महिनाभर आपल्या घरी भाजी नव्हती, नाव मोठं झाल्यामुळे कोणाकडे मागायचं, अशी परिस्थिती होती, असं जरांगे म्हणाले. आपण घरात नसताना पत्नी आणि लेकरांनी दुसऱ्याच्या बांधावर काम करून तीनशे रुपये मिळवायचे, अशा हालअपेष्टा समाजाच्या लेकरांसाठी सहन केल्याचं त्यांनी सांगितलं. गरीब मराठ्यांचं आंदोलन श्रीमंत मराठ्यांच्या जीवावर सुरू असून आपल्याला बसायला गाडी देणाऱ्यांवर केसेस होतात, सोबत राहणाऱ्यांवर दंड आणि चौकश्या होतात, असा आरोपही त्यांनी केला. वाकून किंवा शरण जाऊन जगायचं नाही आणि समाजाच्या लेकराबाळांचं रक्त विकून पैसा किंवा पदं मिळवली तर आयुष्यात सुखाची झोप लागणार नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.