पहिल्याच दिवशी नोकरी सोडल्यामुळे त्याला वाईट वाटले, कारण त्याला कॉर्पोरेट अनुभव हवा होता. पण नोकरी मिळणे कठीण होते. शेवटी, त्याने फ्रीलांसर म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला.
रेडिट हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यांबद्दल बोलतात. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या शोषणाबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा रेडिटवर होतात. अशीच एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. नोएडामधील एका डिजिटल मार्केटिंग कंपनीत रुजू झालेल्या एका तरुणाने पहिल्याच दिवशी नोकरी सोडल्याचे त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘मी ७ ऑक्टोबर रोजी एका डिजिटल मार्केटिंग कंपनीत रुजू झालो. मी फक्त एक दिवस काम केले. दुसऱ्या दिवशी मी एचआरला फोन करून मी येणार नाही असे सांगितले. मला बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्हची पोस्ट दिली होती. पण पहिल्या दिवशी त्यांनी मला ५०० नंबरवर कोल्ड कॉल करायला लावले, आणि माझा काम करण्याचा वेळ २ ते ११ वाजेपासून संध्याकाळी ७ ते पहाटे ४ वाजेपर्यंत बदलण्याचा त्यांनी निर्णय घेतला.’
पहिल्याच दिवशी नोकरी सोडल्यामुळे त्याला वाईट वाटले, कारण त्याला कॉर्पोरेट अनुभव हवा होता. पण नोकरी मिळणे कठीण होते. शेवटी, त्याने फ्रीलांसर म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला.
पण नंतर त्याच्या टीम लीडरने त्याला फोन केला. त्याने नोकरी सोडणे चांगले झाले असे सांगितले आणि त्याचे कौतुक केले. कारण ३० दिवसांत टार्गेट पूर्ण केले नाही म्हणून त्यांना पगार दिला जात नव्हता. नवीन स्टार्टअपचा अजेंडा हाच आहे हे मला कळले. नवीन कर्मचारी घ्या, त्यांना त्रास द्या, एका महिन्यात ते राजीनामा देतील, त्यांना पगार द्यावा लागणार नाही.
प्रवास आणि स्थलांतराचा खर्च वाया गेल्यामुळे त्याला वाईट वाटले. पण फ्रीलांन्सिंगमध्ये त्याने त्याच्या दुप्पट पैसे कमवले. मी कठोर परिश्रम केले. त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो.
पोस्ट खूप लवकर व्हायरल झाली. अशा कंपन्यांची नावे आणि माहिती उघड करावी, असे अनेक घोटाळे घडत आहेत, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या.
(प्रतिकात्मक चित्र)