पत्नीला आकाशातून प्रेमाचा सरप्राईज!

विमान चालवत असताना मायक्रोफोनद्वारे त्याच विमानातील प्रवासी असलेल्या आपल्या पत्नीला उद्देशून त्याने काही शब्द बोलले जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले.

आपल्या प्रियजनांच्या आनंदासाठी त्यांना माहित नसताना काही सरप्राईज देण्याची आपल्यापैकी अनेकांची सवय असते. अशा अनेक आनंददायी क्षणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज शेअर केले जातात. असाच एक सुंदर व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

इंडिगो विमानातील पायलटने आपल्या पत्नीसाठी दिलेल्या सरप्राईजचा हा व्हिडिओ होता. विमान चालवत असताना मायक्रोफोनद्वारे त्याच विमानातील प्रवासी असलेल्या आपल्या पत्नीला उद्देशून त्याने काही शब्द बोलले जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले. या अनपेक्षित घोषणेने पत्नीच नव्हे तर विमानातील इतर प्रवासीही आश्चर्यचकित झाले.

अचानक प्रवाशांना ऐकू आलेली पायलटची घोषणा अशी होती: "इंडिगोला तुमचा प्रवास सहकारी म्हणून निवडल्याबद्दल धन्यवाद. भविष्यातही तुमच्यासोबत पुन्हा प्रवास करण्याची आमची इच्छा आहे. तसेच, आज विमानातील एका खास प्रवाशासाठी एक खास घोषणा करण्यासाठी मी ही संधी साधू इच्छितो. माझी पत्नी विभा शर्मा, ती पहिल्यांदाच माझ्यासोबत विमानप्रवास करत आहे, तुला विमानप्रवास आवडत असेल अशी मी आशा करतो. यश आणि अपयशात माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. माझा सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणून माझ्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद."

या दुर्मिळ क्षणाचा व्हिडिओ विभा शर्माने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता, परंतु नंतर वैयक्तिक कारणांमुळे काही वेळाने तो काढून टाकल्याचे एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे. "माझ्या पतीने विमानातील घोषणेद्वारे मला आश्चर्यचकित केले, मी पुन्हा त्याच्या प्रेमात पडले" असे कॅप्शन देऊन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. विमानात चढण्यापूर्वी या जोडप्याने काढलेले फोटोही व्हिडिओमध्ये समाविष्ट करण्यात आले होते.

Share this article