कुंभमेळ्यात तिलक लावून एका तरुणाने दिवसाला ६५ हजार रुपये कमावल्याची बातमी खरी आहे का? सत्यता जाणून घेण्यासाठी बातमी वाचा.
डोकं असेल तर कोणीही जगू शकतो, अशी म्हण आपण ऐकली असेल. ही म्हण खरी आहे हे सिद्ध करणारे अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला घडतात. जर एखाद्या व्यक्तीमध्ये जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर श्रीमंत होणे अवघड नाही हे अनेकांनी सिद्ध केले आहे. त्याचप्रमाणे आता उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात एका तरुणाने येणाऱ्या पर्यटकांना आणि भाविकांना केवळ तिलक लावून दिवसाला ६५ हजार रुपये कमावले आहेत, अशी बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कुंभमेळा म्हणजे दररोज लाखो लोक येणारा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा हे सर्वांनाच माहीत आहे. दररोज लाखो लोक या कार्यक्रमाला येतात आणि गंगेत स्नान करतात. सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये तुम्ही गंध, चंदन, कुंकू इत्यादी वस्तू हातात घेऊन येणाऱ्या भाविकांच्या कपाळावर लावून त्यांच्याकडून दहा-वीस रुपये घेताना पाहिले असेल. त्याचप्रमाणे येथे एक तरुण केवळ २० रुपयांना मिळणाऱ्या गंधाच्या गोळीला पाणी लावून येणाऱ्या भाविकांना तिलक लावत होता आणि प्रत्येक भाविकाकडून तो केवळ १० रुपये घेत होता. यामुळे त्याला दिवसाअखेर सुमारे ६५ हजार रुपये मिळाले.
असा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण त्याची सत्यता मात्र अस्पष्ट आहे. पण या तरुणाच्या फोटोसह सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत आणि अनेकजण आम्हीही कुंभमेळ्याला जाऊन असाच सोपा व्यवसाय सुरू करू अशा कमेंट्स करत आहेत. पण तो तरुण स्वतः म्हणाला आहे की ही बातमी खोटी आहे आणि तो केवळ विनोद करत होता, असे वृत्त आहे. पण अशा प्रकारची व्यवसाय कल्पना यशस्वी होऊ शकते हे मात्र खरे आहे. याबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट करून कळवा.