LPG Gas Cylinder : गॅस टंचाईचा फटका; घरगुती LPG सिलिंडर आता 8-10 किलोच, सरकारचा मोठा निर्णय

Published : Mar 23, 2026, 08:30 AM IST
LPG

सार

LPG Gas Cylinder : गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने घरगुती LPG सिलिंडरचे वजन 14.2 किलोवरून 8-10 किलो करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हॉटेल आणि उद्योगांसाठी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात वाढ करण्यात आली आहे.

LPG Gas Cylinder : देशात वाढत्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. घरगुती वापरासाठी मिळणाऱ्या LPG सिलिंडरचे वजन आता 14.2 किलोऐवजी 8 ते 10 किलो करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन वापरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

कमी वजनाचे सिलिंडर, पैसेही कमीच

नवीन निर्णयानुसार, सिलिंडरचा आकार पूर्वीप्रमाणेच राहणार असला तरी त्यात कमी प्रमाणात गॅस भरला जाणार आहे. नागरिकांकडून वापरलेल्या गॅसप्रमाणेच पैसे आकारले जातील. सध्या उपलब्ध असलेले 14.2 किलोचे सिलिंडर संपल्यानंतर नव्या पद्धतीने पुरवठा सुरू होणार आहे.

युद्धामुळे निर्माण झाली गॅस टंचाई

इराण-  इस्राइल यांच्यामधील युद्धाच्या स्थितीमुळे यामुळे जागतिक स्तरावर गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. इस्रायलने इराणमधील गॅस फील्डवर हल्ले केल्याने आणि इराणने प्रत्युत्तर दिल्याने ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत गॅस टंचाई कायम राहण्याची शक्यता आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गॅस तुटवड्याच्या भीतीने अनेक ठिकाणी नागरिकांनी गॅस एजन्सीबाहेर रांगा लावल्याचे चित्र दिसून आले आहे. सरकारच्या आश्वासनांनंतरही नागरिकांमध्ये अनिश्चितता कायम आहे.

व्यावसायिक LPG पुरवठ्यात वाढ

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने व्यावसायिक LPG पुरवठ्यात 20 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हॉटेल्स, ढाबे आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मिनरल वॉटर व्यवसायावरही परिणाम

मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम इतर उद्योगांवरही दिसून येत आहे. मिनरल वॉटर व्यवसायात लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती 60 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे पाण्याच्या बॉक्सच्या किंमतीत वाढ झाली असून रिटेलर आणि डीलर्सवर त्याचा परिणाम होत आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Gold Silver Rate Today : सोन्याचांदीच्या दरात पुन्हा वाढ, दिल्ली-मुंबईसह आजच्या किंमती किती? घ्या जाणून
Petrol Diesel Prices : कच्च्या तेलाचे दर १०० डॉलरच्या पार, जाणून घ्या दिल्ली-मुंबईसह तुमच्या शहरातील आजच्या इंधनाच्या किंमती