एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या, मुंबईत किती रुपयाला सिलिंडर मिळणार?

Published : Oct 01, 2025, 09:59 AM IST

LPG Gas Cylinder: १ ऑक्टोबरपासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. दिल्ली, मुंबई आणि चेन्नईसारख्या शहरांमध्ये किंमती वाढल्या आहेत, मात्र १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

PREV
17
एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या, मुंबईत किती रुपयाला सिलिंडर मिळणार?

आजपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक नवीन बदल झाले आहेत. हे बदल आज १ ऑक्टोबरपासून लागू झाले असून यामध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत.

27
महिन्याच्या पहिल्या तारखेला बसला फटका

महिन्याच्या पहिल्या तारखेला महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्यामुळं घरखर्चावर मोठा परिणाम होणार आहे.

37
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात झाली वाढ

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठया प्रमाणावर वाढली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून घरगुती सिलिंडरच्या किंमती मात्र वाढल्या नाही.

47
दिल्लीत १४ आणि मुंबई-चेन्नईमध्ये १६ रुपयांनी किंमतीत झाली वाढ

दिल्लीत १४ रुपये आणि मुंबई-चेन्नईमध्ये १६ रुपयांनी किंमतीत वाढ झाली आहे. आता दिल्ली १९ किलोचा सिलिंडर आता पूर्वीच्या किंमतीच्या ऐवजी म्हणजेच १५८० वाढून आता १५९५ रुपये झाले आहेत. कोलकात्यात १७०० रुपयांपर्यंत किंमत वाढली आहे.

57
मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती किती झाल्या?

मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. मुंबईत १५४७ रुपये आणि चेन्नईत १७५४ रुपये किंमत वाढण्यात आली आहे. दिल्ली सोडून या तीनही शहरांमध्ये किंमत १६ रुपयांनी वाढली आहे.

67
नवीन दर १ ऑक्टोबरपासून लागू

नवीन व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती या १ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती या सातत्याने कमी होत होत्या पण आता किंमत वाढली आहे.

77
घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल नाही

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही. १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती मात्र वाढलेल्या नाही. ८ एप्रिल रोजी गॅस सिलिंडरची किंमत वाढली होती. मुंबईत त्यावेळी गॅस सिलिंडरची किंमत ८५२ रुपये होती.

Read more Photos on

Recommended Stories