NDA च्या बैठकीत नरेंद्र मोदींची 'नेते' पदी निवड, आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार?

Published : Jun 05, 2024, 07:15 PM ISTUpdated : Jun 05, 2024, 07:17 PM IST
nda meeting elects narendra modi 12

सार

loksabha Election Result - लोकसभा निकालानंतर बहुमत मिळालेल्या एनडीएच्या घटक पक्षांची दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. 

नवी दिल्ली - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १७ वी लोकसभा भंग केल्यानंतर आता देशात पुन्हा सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला पुन्हा बहुमत मिळालं आहे. त्यात भाजपानं सर्वाधिक २४० जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे एनडीएकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. दिल्लीत आज झालेल्या एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

बैठकीत खालील प्रस्ताव पारित करण्यात आला

भारताच्या १४० कोटी जनतेनं गेल्या १० वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारमधील जनकल्याणकारी योजनेतून देशातील प्रत्येक भागात विकास होताना पाहिला आहे. दिर्घकाळापासून जवळपास ६ दशकानंतर भारतातील जनतेने सलग तिसऱ्यांदा पूर्ण बहुमताने सशक्त नेतृत्व निवडलं आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित लढले आणि जिंकले याचा आम्हाला गर्व आहे. आम्ही सर्व एनडीएचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांनी सर्वसमंतीने निवड करत आहोत.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकार भारतातील गरीब, महिला, युवा आणि शेतकरी, शोषित, वंचित आणि पीडित नागरिकांना सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. भारताच्या वारसाचं रक्षण करण्यासाठी देशाच्या सर्वागिण विकासासाठी एनडीए सरकार भारताच्या जनतेतील आयुष्यात सुधार आणण्यासाठी प्रयत्नशील राहील. हा प्रस्ताव सर्वसमंतीने दिनांक ५ जून २०२४ रोजी नवी दिल्लीत मंजूर करण्यात आला.

प्रस्तावावर २१ नेत्यांची स्वाक्षरी

NDA घटक पक्षांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची सर्वसमंतीने नेतेपदी निवड केली आहे. बुधवारी पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावावर २१ नेत्यांची स्वाक्षरी आहे. त्यात टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू, जेडीयूचे प्रमुख नीतीश कुमार यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे.

 

आजच सरकार स्थापनेचा दावा करणार?

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज रात्री ७.४५ मिनिटांनी एनडीएचे घटक पक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. आज राष्ट्रपती भवनात डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या राष्ट्रपतींसोबतच्या बैठकीत एनडीए सरकार स्थापनेचा दावा करू शकते. दरम्यान, एनडीएच्या सर्व खासदारांना ७ जून रोजी राष्ट्रपतींसोबत भेट करण्याची संधी मिळणार आहे.

आणखी वाचा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा, राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींची घेतली भेट

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!