Lok Sabha Election 2024 Phase 1: Google डूडलने आठवण करून दिली मतदानाच्या हक्काची

Published : Apr 19, 2024, 12:41 PM ISTUpdated : Apr 19, 2024, 12:44 PM IST
Google Doodle

सार

आज 19 एप्रिल रोजी भारत 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान  होणार आहे. या दिवसाची आठवण करून देण्यासाठी Google ने आपल्या मुख्यपृष्ठावर डूडलसह निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव साजरा केला.

आज भारतात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील मतदान होत आहे. या दिवसाची सर्व भारतीयांना आठवण रहावी आणि आज आपल्याला मतदानाचा हक्क बजावून आपली लोकशाही अधिकाधिक बळकट करण्यासाठी गुगलने भारतीयांसाठी खास डूडल सादर केले आहे.

आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर मतदान होत आहे. या दिवसाची आठवण करून देण्यासाठी Google ने आपल्या मुख्यपृष्ठावर डूडलसह निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव अशा पद्धतीने साजरा केला. डूडलमध्ये भारतातील मतदारांसाठी प्रथेप्रमाणे, दुसऱ्या 'ओ' च्या जागी मतदान करणाऱ्या हाताची प्रतिमा आणि तर्जनीवरील शाईचे चिन्ह असलेले Google लोगो सादर केला आहे. लोकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती निर्माण करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.

निवडणूकांच्या माध्यमातून लोकशाहीचा उत्सव

2024 च्या लोकसभा निवडणुका 19 एप्रिलपासून सात टप्प्यांत होणार आहेत पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 102 जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीचा अंतिम टप्पा 1 जून २०२४ रोजी होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे.भारतातील 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 1.44 अब्ज लोकसंख्येपैकी सुमारे 970 दशलक्ष लोक मतदानासाठी पात्र आहेत लोकसभेच्या एकूण 543 जागा असून या सर्वांवर 2024 च्या निवडणुकीत निवडणूकांच्या माध्यमातून लोकशाहीचा हा उत्सव साजरा होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्यांनी दुस-यांदा कार्यभार सांभाळला, ते सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या तयारीत आहेत. त्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची मानली जात आहे.

या राज्यांमध्ये होणार मतदान :

19 एप्रिलला, उत्तर प्रदेशातील आठ, राजस्थानातील 13, मध्य प्रदेशातील सहा, आसाममधील पाच, बिहारमधील चार, महाराष्ट्रातील पाच, जम्मू-काश्मीर आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी एक, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमधील प्रत्येकी दोन, त्रिपुरामधून एक, उत्तराखंडमधील सहा, तामिळनाडूमध्ये 39, पश्चिम बंगाल, सिक्कीम, नागालँड, अंदमान आणि निकोबार, मिझोराम, पुडुचेरी, मणिपूर आणि लक्षद्वीपमध्ये मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान : 

* नागपूर - नितीन गडकरी (भाजप) वि. विकास ठाकरे (काँग्रेस)

*चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार (भाजप) वि. प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)

* रामटेक- राजू पारवे (शिंदे गट) वि. श्यामकुमार बर्वे (काँग्रेस)

* भंडारा गोंदिया- सुनील मेंढे (भाजप) वि. प्रशांत पडोळे (काँग्रेस)

* गडचिरोली-चिमूर - अशोक नेते (भाजप) वि. नामदेव किरसान (काँग्रेस)

PREV

Recommended Stories

Indigo मुळे नवविवाहित जोडप्याचे अपरिमित नुकसान, स्वतःच्या रिसेप्शनला लावली 'व्हर्च्युअल' हजेरी!
EMI मध्ये मोठा दिलासा! RBI ने रेपो रेट घटवला, कर्ज घेणे होणार स्वस्त, जाणून घ्या फायदा