आईपीएल ट्रॉफी जिंकलेल्या आरसीबी संघाच्या विजयोत्सवाच्या जल्लोषात चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरी झाली आणि ११ जणांचा मृत्यू झाला. गर्दी नियंत्रित करण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारवर विरोधी पक्षांनी टीका केली आहे.
१८ वर्षांनी आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या आरसीबीच्या विजयोत्सवाचा जल्लोष बंगळुरूमध्ये दुर्दैवी ठरला.
215
चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. वैदेही आणि बाउरिंग रुग्णालयात अनुक्रमे ४ आणि ७ जणांचा मृत्यू झाला.
315
अपेक्षेपेक्षा जास्त चाहते आयपीएल ट्रॉफी विजेत्या संघाला पाहण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमवर आले होते.
अहमदाबादमध्ये झालेल्या आयपीएल अंतिम सामन्यात आरसीबीने किंग्ज इलेव्हन पंजाबला ६ धावांनी हरवून पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली.
515
ट्रॉफी जिंकताच विराट कोहली भावुक झाला आणि त्याचे अश्रू पाहून चाहतेही भावुक झाले. पण कोहलीच्या अश्रूंवर शोक व्यक्त करणारे आज काळाच्या पडद्याआड गेले ही शोकांतिका आहे.
615
इतक्या मोठ्या संख्येने चाहते येतील याचा अंदाज असतानाही राज्य सरकारने योग्य ती व्यवस्था केली नव्हती. योग्य बॅरिकेड्स आणि व्यवस्था असती तर हा प्रकार टाळता आला असता.
715
मुले, तरुण अशा ११ जणांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांचा हंबरडा रुग्णालयाबाहेर ऐकू येत होता.
815
पोलिस लहान मुलांना उचलून रुग्णालयात नेत होते, हे दृश्य चिन्नास्वामी स्टेडियमवर सर्वत्र दिसत होते.
915
चेंगराचेंगरी झाल्यावर रस्त्यावरच कोसळलेल्या आणि बेशुद्ध पडलेल्या चाहत्याला उपस्थितांनी सीपीआर देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
1015
या घटनेत १४ वर्षीय दिव्यांशीचाही मृत्यू झाला. ९वीत शिकणारी दिव्यांशी तिच्या काकूसोबत स्टेडियमवर आली होती.
1115
आरसीबीच्या चाहत्यांनी चिन्नास्वामी स्टेडियमचा मुख्य दरवाजा तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लाठीमारही केला.
1215
विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली असून ही सरकारने केलेली हत्या असल्याचा आरोप केला आहे.
1315
मृतांची संख्या वाढत असताना स्टेडियममध्ये आरसीबीचा जल्लोष सुरू होता. मात्र, कार्यक्रमाचा कालावधी कमी करण्यात आला.
1415
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले, मोठ्या संख्येने चाहते आले होते. ५ हजार पोलिस तैनात करण्यात आले होते, पण गर्दी नियंत्रित करता आली नाही.
1515
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी बाउरिंग रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.