
जालन्यात मंत्री मेघना बोर्डीकर यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे दिवाळीपूर्वी मिळतील, असं सांगितलं. मराठवाड्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर बोलताना केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दुष्काळामुळे महिलांचे आरोग्य, मुलींचं शिक्षण, बालविवाह, स्थलांतर आणि शेतकरी आत्महत्या यांसारख्या समस्या वाढण्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. जलसाक्षरता आणि दुष्काळ निवारणासाठी महिलांशी संवाद साधून त्यांच्या सूचना घेतल्याचं सांगितलं. राज्यात पुरेशी वीज उपलब्ध असून मागणी वाढल्यास ग्रीड स्थिरतेसाठी काही भागांत तात्पुरता वीजपुरवठा बंद करावा लागत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.