कुर्ला चिराग नगरमध्ये दरड कोसळली, 6 संशयित मृतदेह | Landslide | Ritu Tawde | NDRF

कुर्ला चिराग नगरमध्ये दरड कोसळली, 6 संशयित मृतदेह | Landslide | Ritu Tawde | NDRF

Published : Aug 12, 2026, 03:03 PM IST

मुंबईतील कुर्ला पश्चिमच्या चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीत बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. चाळीचा काही भाग कोसळून त्याचा ढिगारा जवळच्या दोन ते तीन खोल्यांवर पडला. या दुर्घटनेत 6 ते 8 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, 6 संशयित मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दोन जखमींना कुर्ला भाभा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पहाटे 3 वाजून 48 मिनिटांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळाली आणि 4 वाजून 32 मिनिटांनी दुर्घटनेला लेव्हल-2 घोषित करण्यात आलं. मुंबई अग्निशमन दल, NDRF, पोलीस आणि BMCची पथकं घटनास्थळी बचावकार्य करत आहेत. विशेष बचाव उपकरणांच्या मदतीने ढिगारा हटवण्याचं काम सुरू असून, सुमारे 50 BMC कर्मचारी आणि NDRFचे जवान सहभागी आहेत. दरम्यान, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अविनाश धाकणे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध बचाव पथकांकडून सुरू आहे.

05:53मोदींचा फोटो हटवल्यावर एकनाथ शिंदे काय म्हणाले? | Amit Thackeray | Manoj Jarange
05:36अन्नसाठ्यात फेरफार; पोलीस-FDAची कंपनीवर कारवाई | FDA | Food Safety
03:09विद्यार्थी आंदोलनांच्या FIRवर अभिजीत दिपकेंचे मत | CJP | Student Protest
04:427.8% GDP Growth | GDP वाढीवर एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला | Eknath Shinde
04:09उदय सामंतांचा राऊतांना टोला; ऑपरेशन टायगरवर दावा | 7.8% GDP Growth | Sanjay Raut
04:02अमित ठाकरे यांनी फोटो हटवला, यावर संजय राऊत म्हणतात sanjay raut
03:17भाजपा नेत्यांना भाषण माफिया का म्हणाले संजय राऊत | Sanjay Rahut on BJP
03:28CJP ला काँग्रेस जिताओ पार्टी म्हटल्यावर, संजय राऊत यांची भाजपावर प्रतिक्रिया
01:08मनोज जरांगेंच्या उपोषणात रक्तातील साखर घटली | Manoj Jarange | Maratha Protest
09:03मनोज जरांगेंच्या उपोषणात रक्तातील साखर घटली | Manoj Jarange | Maratha Protest