Kolkata Rain : रात्रभर मुसळधार पाऊस, कोलकाता-सॉल्टलेक पाण्याखाली, ट्रेनसेवा विस्कळीत!

Published : Sep 23, 2025, 09:04 AM IST

Kolkata Rain : रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कोलकाता आणि आसपासचा परिसर पाण्याखाली गेला आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने ट्रेनसेवा विस्कळीत झाली आहे, तर अनेक भागांमध्ये दुर्गा पूजेच्या तयारीवरही पाणी फेरले आहे.

PREV
15
कोलकाता आणि सॉल्टलेक परिसरात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने कोलकाता, सॉल्टलेक आणि आसपासच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने ट्रेनसेवा विस्कळीत झाली असून पूजेची तयारी थांबली आहे. रस्त्यांवर पाणी साचून आहे.

25
रात्रभरच्या पावसाने अनेक भाग पाण्याखाली, सियालदह मार्गावर परिणाम

रात्रभरच्या पावसामुळे कसबा, व्हीआयपी बाजार, न्यूटाऊनसह अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने सियालदह दक्षिण मार्गावरील ट्रेनसेवा विस्कळीत झाली आहे. घरांमध्ये पाणी शिरले आहे.

35
उत्तर बंगालमध्ये शनिवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज, ऑरेंज अलर्ट जारी

या पावसामुळे अनेक शाळांनी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सततच्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे. पूजा आयोजकही चिंतेत आहेत, कारण शेवटच्या क्षणाची तयारी थांबली आहे. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे.

45
गेल्या २४ तासांत कोलकात्यात पावसाची विक्रमी नोंद

गेल्या २४ तासांत माणिकतळा १६९ मिमी, तपसिया २७५ मिमी, उल्टाडांगा २०७ मिमी, चिंगरीघाटा २३७ मिमी, बालीगंज २६४ मिमी, कालीघाट २८०.२ मिमी, जोधपूर पार्क २८५ मिमी पाऊस झाला. विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

55
हवामान खात्याचा अंदाज, सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला

हवामान खात्याने दोन दिवसांपासून पावसाचा अंदाज दिला होता. पण, परिस्थिती इतकी गंभीर होईल, याचा अंदाज नव्हता. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस मध्यरात्री वाढला आणि अनेक भाग पाण्याखाली गेले. जनजिवन विस्कळीत झाले आहे.

Read more Photos on

Recommended Stories