या मराठी शेतकऱ्याने अख्ख्या गावाला जेवण घालून साजरा केला बैलाचा वाढदिवस!

Published : Feb 25, 2026, 08:07 AM IST
Karnataka Farmer Hosts Grand Birthday Party for His Ox

सार

Karnataka Farmer Hosts Grand Birthday Party for His Ox : शेतकरी उमेश शिंदे यांनी आपल्या 'चंदा' नावाच्या बैलाचा तिसरा वाढदिवस संपूर्ण गावाला जेवण देऊन मोठ्या थाटामाटात साजरा केला. 

Karnataka Farmer Hosts Grand Birthday Party for His Ox : एका शेतकऱ्याने आपल्या मुलाप्रमाणे वाढवलेल्या 'चंदा' नावाच्या बैलाचा तिसरा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे. ही घटना बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातल्या संबरगी गावात घडली आहे.

अथणी तालुक्यातील संबरगी गावचे एक गरीब शेतकरी, उमेश शिंदे यांनी आपल्या बैलाच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण गावाला जेवण दिलं. यासाठी मोठा शामियाना उभारण्यात आला होता, चविष्ट जेवणाची सोय होती आणि आकाशात रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी पाहून सगळेच थक्क झाले.

गावात जणू जत्रेचं वातावरण

आपल्या मुलाप्रमाणे वाढवलेल्या 'चंदा' नावाच्या बैलाचा तिसरा वाढदिवस त्यांनी साजरा केला. बैलाला खास सजवण्यात आलं, केक कापला, मिठाई वाटली आणि गावकऱ्यांसोबत मिळून गावात जणू सणासुदीचं वातावरण तयार केलं. हजारो गावकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन 'चंदा' बैलाला आशीर्वाद दिले.

हा बैल आहे गावचा अभिमान

महाराष्ट्रातील शर्यतीच्या मैदानांमध्ये धुमाकूळ घालून नाव कमावलेला हा बैल आता गावासाठी अभिमानाचा विषय बनला आहे. या शेतकऱ्याच्या मोठ्या मनाचं गावकऱ्यांनीही खूप कौतुक केलं.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Sonia Gandhi Love Story : सोनिया आणि राजीव गांधींची लव्हस्टोरी कुठे सुरू झाली? सोनिया गांधींनीच सांगितला किस्सा
Airport Privatisation: हुबळीसह देशातील ११ विमानतळ ५० वर्षांसाठी खाजगी हातात, डिसेंबरमध्ये निघणार टेंडर!