Jantar Mantar Protest: सीजेपी नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना जामीन मंजूर

vivek panmand   | CMS
Published : Oct 21, 2026, 06:53 PM IST
Jantar Mantar Protest: सीजेपी नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना जामीन मंजूर

सार

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या सौरव दास आणि आशुतोष रांका यांना अखेर जामीन मिळाला आहे. तब्बल ९ दिवसांनंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली.

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) दोन नेत्यांना अखेर जामीन मिळाला आहे. सौरव दास आणि आशुतोष रांका अशी या नेत्यांची नावे असून, दिल्लीच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. तब्बल ९ दिवस तुरुंगात काढल्यानंतर या दोघांची सुटका झाली आहे.

दिल्ली पोलिसांनी या दोघांना जंतरमंतर या प्रतिबंधित क्षेत्रात घुसखोरी करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले होते. जामिनाच्या सर्व अटी पूर्ण केल्यानंतर दिल्ली न्यायालयाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले. जामिनावर बाहेर आल्यानंतर पक्ष नेतृत्वाने सांगितले की, सरकार लोकशाही मार्गाने होणारी आंदोलने दडपण्याचा प्रयत्न करत आहे, पण आमचा कायदेशीर लढा यापुढेही सुरूच राहील.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Indian Origin Father: ५ वर्षांच्या लेकीच्या अंत्यसंस्कारासाठी बापाची धडपड, मदतीचं आवाहन
Bachelor Party Deux: 'बॅचलर पार्टी Deux' मधून शाईन टॉम चाकोचा 'गुरू' लुक रिलीज!