
चॅम्पियन लीग स्पर्धेला आयसिस या दहशतवादी संघटनेनं लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. या लीगच्या उपांत्यपूर्व सामन्यांच्या पहिल्या पहिल्या टप्याचे आयोजन करणाऱ्या चार स्टेडियमला लक्ष केले जाणार आहे. यावेळी हा संदेश ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झाला असून त्यामध्ये मारून टाका असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सगळीकडे एकच हाहाकार उडाला आहे.
येथे सामना पाहत असताना प्रेक्षकांवर हल्ला करण्याची योजना असून त्यामध्येच ही धमकी देण्यात आली आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेनं मागच्या महिन्यात रशियामध्ये दहशतवादी हल्ला केला होता. मोठ्या कॉन्सर्ट हॉल मध्ये हा हल्ला करण्यात आला होतायावेळीही हा हल्ला केला जाणार असून त्यामुळे प्रेक्षकांमध्ये घाबरत निर्माण झाली आहे.
यावेळी क्रीडा स्पर्धा सुरक्षित वातावरणात होतील का नाही याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. यावेळी खेळाडू आणि प्रशिक्षण यांना संरक्षण दिले जाणार असून तरीही सामन्यावर दहशतवादी हल्ल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. यावेळी संभाव्य धोके आणि सुरक्षेचा आढावा घेतला जाणार असून भविष्यात अशा प्रकारची कोणतीही समस्या उदभवू नये याची काळजी घेतली जाईल.
आणखी वाचा -
महाविकास आघाडीची आज संयुक्त पत्रकार परिषद, सांगली आणि भिवंडीच्या जागेचा तिढा सुटणार?
सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला न मिळाल्यामुळे विश्वजित कदम नाराज, विशाल पाटील अपक्ष उमेदवारी दाखल करणार