iPhone 18 Pro : बायकोला आयफोन देण्यासाठी दिल्लीच्या पठ्ठ्याने चक्क सोनं विकलं!

Published : Sep 18, 2026, 12:57 PM IST
iPhone 18 Pro : बायकोला आयफोन देण्यासाठी दिल्लीच्या पठ्ठ्याने चक्क सोनं विकलं!

सार

भारतात आयफोन १८ प्रो ची विक्री सुरू झाली असून, नोएडामधील ॲपल स्टोअरबाहेर लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यात एका व्यक्तीने आपल्या बायकोला नवीन बरगंडी रंगाचा आयफोन गिफ्ट करण्यासाठी चक्क सोनं विकल्याचं सांगितलं.

मुंबई : भारतात आता आयफोन १८ प्रो ची विक्री अधिकृतपणे सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकांमध्ये आयफोनची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. नवीन आयफोन हातात घेण्यासाठी लोक इतके उत्सुक होते की, स्टोअर उघडण्यापूर्वीच बाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. इंडिया टुडे टेकच्या टीमने नोएडातील अॅपल स्टोअरबाहेर काही ग्राहकांशी संवाद साधला. यावेळी एका ग्राहकाने आपल्या बायकोला आयफोन १८ प्रो घेण्यासाठी चक्क सोनं विकल्याचं सांगितलं.

सकाळी ८ वाजता ॲपल स्टोअर उघडण्यापूर्वीच डीएलएफ मॉल ऑफ इंडियाच्या बाहेर ग्राहकांची मोठी रांग लागली होती. या रांगेत सर्वात पुढे उभ्या असलेल्या एका दिल्लीच्या व्यक्तीने आमच्याशी गप्पा मारल्या. त्याने आपल्या बायकोला गिफ्ट देण्यासाठी आयफोन १८ प्रो ची निवड केली होती. तो म्हणाला, "मी माझ्या बायकोसाठी आयफोन १८ प्रो खरेदी करत आहे." त्याच्या बायकोने त्याला खास बरगंडी रंगाचा आयफोन १८ प्रो आणायला सांगितला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने पुढे सांगितलं की त्याच्या बायकोकडे आयफोन नव्हता, म्हणूनच त्याला हे नवीन मॉडेल तिला गिफ्ट करायचं होतं. त्याने आयफोन १८ प्रो चीच वाट का पाहिली, असं विचारल्यावर तो म्हणाला, "आज पैसा आहे, पूर्वी नव्हता. पुढे असेल की नाही माहीत नाही, पण आपण आजमध्ये जगत आहोत."

सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा फोन घेण्यासाठी आपण खरंच सोनं विकल्याची कबुली या दिल्लीच्या पठ्ठ्याने दिली. तो हसत म्हणाला, "सोनं विकूनच तर हा फोन घ्यायला आलोय."

नोएडा ॲपल स्टोअरबाहेर लागलेल्या रांगेत विद्यार्थी, व्यावसायिक आणि नोकरदार वर्गाचा समावेश होता. काही ग्राहकांनी तर हा फोन लवकर मिळवण्यासाठी चक्क ऑफिसला सुट्टी टाकली होती. पण, बाहेर उभ्या असलेल्या प्रत्येकालाच फोन घेता आला नाही. ज्या ग्राहकांनी आयफोन १८ प्रो चं प्री-बुकिंग केलं नव्हतं, त्यांना स्टोअरमध्ये प्रवेश दिला गेला नाही.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Ramdas Athawale: 'मतं चोरीला गेली तर राहुल गांधी कसे जिंकले?', आठवलेंचा विरोधकांना सवाल
Dhruv Rathee Press Conference | ध्रुव राठींचं मोदी, शाह, ज्ञानेश कुमारांना आव्हान