Delhi Crime : दिल्लीत १७ वर्षीय मुलीवर गँगरेप आणि हत्या, मृतदेह कुत्र्यांनी लचके तोडलेल्या अवस्थेत सापडला

Published : Sep 18, 2026, 12:48 PM IST
Delhi Crime : दिल्लीत १७ वर्षीय मुलीवर गँगरेप आणि हत्या, मृतदेह कुत्र्यांनी लचके तोडलेल्या अवस्थेत सापडला

सार

दिल्लीच्या स्वरूप नगरमध्ये एका १७ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. १३ सप्टेंबरला एका मोकळ्या मैदानात तिचा कुजलेला मृतदेह सापडला. या प्रकरणी पोलिसांनी ३ अल्पवयीन मुलांसह ४ जणांना अटक केली आहे. हे सर्वजण मुलीच्या ओळखीचे होते.

मुंबई : दिल्लीतील स्वरूप नगरमध्ये एका १७ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह एका मोकळ्या मैदानात फेकून दिला होता. हा मृतदेह इतका कुजला होता की सुरुवातीला फॉरेन्सिक टीमलाही तिचं लिंग ओळखता आलं नाही. पोलिसांनी गुरुवारी सांगितलं की, या प्रकरणी ४ आरोपींची ओळख पटली आहे. यात ३ अल्पवयीन (१६ ते १७ वर्षे वयोगटातील) मुलांचा समावेश आहे, ज्यांच्यासोबत ती एका टेम्पोतून गेली होती. चौथ्या आरोपीचं नाव शिवम ऊर्फ सुदामा असं आहे.

१३ सप्टेंबरच्या सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. स्वरूप नगरमधील कुशक रोडजवळील शेतात एका महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे होते. मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यापूर्वी आरोपींनी टेम्पोमध्ये एकत्र दारू प्यायली होती. धक्कादायक म्हणजे, मोकाट कुत्र्यांनी मुलीच्या मृतदेहाचे लचके तोडले होते आणि तिचा एक हात शरीरापासून वेगळा होऊन शेतात पडलेला आढळला, असंही पोलिसांनी सांगितलं.

मुलीच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्याची कोणतीही तक्रार पोलिसांत दिली नव्हती. ती अनेकदा घर सोडून जायची आणि काही दिवसांनी परत यायची, असं तिच्या घरच्यांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासून या गुन्ह्याची उकल केली. सीसीटीव्हीमध्ये एका टेम्पोची संशयास्पद हालचाल पोलिसांना दिसली. अंधार आणि अस्पष्ट दृश्य असल्यामुळे सुरुवातीला गाडीचा नंबर ओळखणं कठीण जात होतं. पण नंतर शोध घेतल्यानंतर हा टेम्पो खड्डा कॉलनीमध्ये पार्क केलेला सापडला.

पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी केली. त्याच्या चौकशीनंतर इतर तीन संशयितांची ओळख पटली आणि चारही जणांना अटक करण्यात आली.

गुन्ह्याच्या वेळी आरोपींनी घातलेले रक्ताने माखलेले कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. यासोबतच हत्येसाठी वापरलेले दोन चाकूही पोलिसांच्या हाती लागले आहेत.

टेम्पो चालकाला पकडून चौकशी केल्यानंतर तीन अल्पवयीन मुले आणि शिवम ऊर्फ सुदामा याला अटक करण्यात आली. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी 'पॉक्सो' (POCSO) कायद्याचे कलम ६ आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : 'TTE ने जास्तीचे पैसे घेतले', रेल्वेची चादर चोरताना जोडप्याला रंगेहाथ पकडलं!
iPhone 18 Pro ची क्रेझ! मुंबई-दिल्लीतील Apple Store बाहेर पहाटेपासून ग्राहकांच्या लांबच लांब रांगा