
International Yoga Day 2025 : आज 21 जूनला जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जात आहे. योग हा भारताचा प्राचीन वारसा असून तो केवळ व्यायाम किंवा आसने नसून मन, शरीर आणि आत्म्याच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. योगामुळे मानसिक शांती, आरोग्य सुधारणा, आणि आध्यात्मिक उन्नती मिळते. याचे महत्त्व संपूर्ण जगाला पटवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी योगा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावत योगाभ्यास केल्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. याशिवाय त्यांनी देशातील नागरिकांना योगा दिनानिमित्त खास मेसेजही दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विशाखापट्टणमध्ये योगा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशाखापट्टणम येथे आहेत. या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या भव्य योगा दिनाच्या कार्यक्रमाला त्यांनी पहाटेच उपस्थिती लावली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिकांनी त्यांच्यासोबत योगाभ्यास केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगाचा खरा अर्थ आणि महत्वही पटवून दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात योगाभ्यास केला
आसामचे मुख्यमत्री हिमंत बिस्व शर्मा यांचा योगा
केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांचा दिल्लीत योगा
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा योगा
केंद्रीय मंत्री शिवराज चौहान यांनी केला योगा
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा योगा
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा योगा
हरियाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी यांनी योग गुरू रामदेव बाबांसोबत योगा केला.
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.