Interim Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी (1 फेब्रुवारी) देशातील पर्यटन क्षेत्रासाठी सरकारच्या भरीव गुंतवणूक योजनांबाबतची माहिती देखील सांगितली.
Interim Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी (1 फेब्रुवारी) देशातील पर्यटन क्षेत्रासाठी सरकारच्या भरीव गुंतवणूक योजनांबाबतची माहिती देखील सांगितली. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी लक्षद्वीप बेटासह देशातील अन्य बेटांचा विकास करण्यावर भर देणार असल्याचे म्हटले. याकरिता पर्यटन क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढवण्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटनाला चालना देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून लक्षद्वीप बेटास पर्यटन पायाभूत सुविधा व गुंतवणूक मिळणार आहे. लक्षद्वीप बेटास भारतीय पर्यटकांसाठी एक आकर्षक स्थळ म्हणून स्थान देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.
पर्यटन केंद्रांच्या सर्वांगीण विकासाबाबत नेमके काय म्हणाल्या निर्मला सीतारमण?
आणखी वाचा
Budget 2024 : सात लाख रूपयांच्या उत्पन्नावर कर द्यावा लागणार नाही - निर्मला सीतारमण
Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा मासिक पगार किती? जाणून घ्या