Indian Jugaad जगन्नाथ रथासाठी आधी बोईंग अन् आता सुखोई लढाऊ विमानाची चाके

Published : Jun 02, 2025, 09:08 AM IST
Indian Jugaad जगन्नाथ रथासाठी आधी बोईंग अन् आता सुखोई लढाऊ विमानाची चाके

सार

कोलकाता येथील इस्कॉन जगन्नाथ मंदिराच्या रथाची चाके बदलण्याचे २० वर्षांचे प्रयत्न आता फळाला आले आहेत. विशेष म्हणजे, या रथासाठी लाकडी किंवा दगडी चाके वापरण्याऐवजी, बोईंग विमानाचे चाक बसवण्यात आले होते.

कोलकाता : येथील इस्कॉन जगन्नाथ मंदिराच्या रथाची चाके बदलण्याचे २० वर्षांचे प्रयत्न आता फळाला आले आहेत. विशेष म्हणजे, या रथासाठी लाकडी किंवा दगडी चाके वापरण्याऐवजी, बोईंग विमानाचे चाक बसवण्यात आले होते. त्याजागी आता सुखोई लढाऊ विमानाची चाके येणार आहेत. जून २७ रोजी यावर्षीची यात्रा होणार असून त्याआधी नवीन चाके बसवली जात आहेत.

१९७२ मध्ये ३ देवतांच्या मूर्ती असलेल्या छोट्या रथाची यात्रा सुरू करण्यात आली होती. ५ वर्षांनंतर, जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्यासाठी एका भाविकांनी ३ वेगवेगळे रथ दान केले. सुरुवातीला, जड असलेल्या जगन्नाथाच्या रथासाठी बोईंग विमानाला वापरले जाणारे चाक बसवण्यात आले होते. कालांतराने ती झिजल्याने, २००५ मध्ये ती बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोठ्या रथाचे वजन सहन करू शकणारी चाके लागणार होती. त्यासाठी रथाचे वजन माहीत असणे आवश्यक होते. ९ टन वजनाच्या रथात भाविकही असतील तर ते १६ टन वजनाचे होईल असे लक्षात आले. एवढे वजन सहन करू शकणाऱ्या चाकाचा शोध सुरू झाला. तेव्हा चाके पुरवण्यासाठी डनलप कंपनीशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी उत्पादन बंद केल्याचे कळाले.

२०१८ मध्ये सुखोईच्या चाकांचे उत्पादक एमआरएफशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी सुरुवातीला प्रतिसाद दिला नाही. पण ६ वर्षांनंतर २०२४ मध्ये त्यांनी प्रतिसाद दिला आणि गेल्या महिन्यात सुखोई विमानांची चाके पाठवून ती रथास बसवून दिली. याबाबत कोलकाता इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारामन दास यांनी आनंद व्यक्त केला आहे.

विमानाचे चाक का?

रथासोबत भाविकही असतील तर १६ टन वजन होते. हे वजन सहन करण्यासाठी जास्त क्षमतेची चाके लागत होती. म्हणून बोईंगऐवजी सुखोईची चाके वापरण्यात आली.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

वंदे मातरम् एडिट केल्यानेच देशाची फाळणी? अमित शहांच्या विधानाने संसदेत वाद
महिला कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी; मासिक पाळीच्या रजेला हायकोर्टाची स्थगिती