
Operation Sindoor : भारताने दहशतवादाच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर लाँच केला आहे. पाकिस्तानात 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइल करण्यात आला आहे. भारताने दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला आहे. असे सांगितले जात आहे की, भारतीय वायूसेनेने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात एअर स्ट्राइक केले आहे.भारतीय सैन्याने ही कारवाई दीड वाजल्याच्या सुमाराच्या आसपास केली आहे. हा हल्ला बहावलपुर, कोटली आणि मुजफ्फराबाद येथे करण्यात आला आहे.
सुरुवातीच्या माहितीनुसार, भारतीय वायुसैन्याने अत्यंत योग्य आणि सावधगिरीने दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला आहे. पीआयबीने माहिती दिली आहे की, ऑपरेशन सिंदूरची प्लॅनिंग अत्यंत राजकीय रुपात तयार करण्यात आली. जेणेकरुन दहशतवाद्यांच्या हालचालींना सडेतोड उत्तर दिले जाऊ शकते.
पीआयबीने सांगितले की, ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तान सैन्य सुविधांचा हात लावण्यात आलेला नाही. याशिवाय वायुसैन्याकडून हा एअर स्ट्राइल मॉक ड्रिलच्या एक दिवस आधीच करण्यात आला आहे.
बहावलपूर: पाकिस्तानमध्ये १०० किमी आत
मुरीदके: पाकिस्तानमध्ये ३० किमी आत
गुलपूर: पाकिस्तानमध्ये ३५ किमी आत
सवाई कॅम्प: पाकिस्तानमध्ये ३० किमी आत
बिलाल कॅम्प: अंतर निर्दिष्ट नाही
कोटली कॅम्प: पाकव्याप्त काश्मीरमध्ये १५ किमी आत
बरनाळा कॅम्प: पाकव्याप्त काश्मीरमध्ये १० किमी आत
सरजाल कॅम्प: पाकव्याप्त काश्मीरमध्ये ८ किमी आत
महमूना कॅम्प: पाकव्याप्त काश्मीरमध्ये १५ किमी आत
भारताने स्ट्राइकदरम्यान, दहशतवाद्यांची ठिकाणे पूर्णपणे उडवली आहेत. दरम्यान, पहलगाम मधील बैसरन घाटात दहशतवाद्यांनी 22 एप्रिलला दहशतवादी हल्ला केला होता. यावेळी 26 निर्षोद नागरिकांचा जीव गेला होता. याच हल्ल्यानंतर भारताने याचे परिणाम भोगण्यास तयार रहा असा इशारा दिला होता.