भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी अद्याप कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच नागरिकांकडून पावसाच्या सरी कधी बरसणार याची वाट पाहिली जात आहे. पण यंदाच्या वर्षात भारतातील उन्हाच्या तापमानाने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत,
India Heatwave : जून महिना आला तरीही अद्याप कडाक्याच्या उन्हाचा तखाडा नागरिकांना बसत आहे. भारतातील काही ठिकाणी 50 अंश सेल्सिअसच्या पार तापमान गेल्याची नोंद करण्यात आली आहे. खरंतर, यंदाच्या वर्षात उष्णतेची लाट पूर्वीपेक्षा अधिक प्रदीर्घ आल्याचे दिसून आले आहे. पश्चिम भारत, पूर्वेसह दक्षिण राज्यांमधील काही ठिकाणांनाही उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे.
दरम्यान, उष्णतेची लाट संपूर्ण मे महिन्यात कायम राहिलीच. पण आता भारतात नैऋत्य मान्सून दाखल होत नाही तोवर जूनच्या मध्यापर्यंत भीषण उन्हाचा तडाखा नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. खरंतर, यंदाच्या वर्षात सर्वाधिक मोठी उष्णतेची लाट आल्याचे दिसून आले आहे.
उष्णतेची लाट म्हणजे नक्की काय?
उष्णतेच्या लाटेची व्याख्या देश ते देश आणि वातावरणानुसार बदलली जाते. भारतातील हवमान खात्यानुसार उष्णतेच्या लाटेच्या दोन व्याख्या आहेत. एक व्याख्या म्हणजे उष्णतेची लाट 6.4 अंश सेल्सिअसपेक्षा तापमान अधिक असल्यास त्याला तीव्र उष्णतेची लाट असे म्हटले जाते. सर्वसामान्य तापमान हे 4.5 अंश सेल्सिअ ते 6.4 अंश सेल्सिअसपर्यंत मानले जाते.
दुसरी व्याख्या अशी की, हवमानाच्या तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा पार पार केल्यास त्याला उष्णतेची लाट आल्याचे म्हटले जाते. याशिवाय किनारपट्टीच्या भागात 30 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान झाल्यास तेथे उष्णतेची लाट आल्याचे म्हटले जाते. उष्णतेच्या लाटेमागील कारणे म्हणजे अत्याधिक वाढलेली आर्द्रता, वेगाने वाहणारे वारे आणि उष्णतेच्या लाटेचा कालावधी असल्याचे हवामान खात्याने एका प्रश्न उत्तरात स्पष्ट केले होते.
उष्णतेच्या लाटेसाठी वेगवेगळे रंग
उष्णतेच्या लाटेसंदर्भात वेगवेगळे रंग देखील हवामान खात्याकडून ठरवण्यात आले आहेत. तापमान सर्वसामान्य राहणार असल्यास तेथे ग्रीन अॅलर्ट, उष्णतेची लाट दोन दिवस कायम राहणार असल्यास यल्लो अॅलर्ट, चार दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्यास ऑरेंज अॅलर्ट आणि उष्णतेची लाट सहा दिवस राहणार असल्याल रेड अॅलर्ट दिला जातो.
उष्णतेच्या लाटेचा होणारा परिणाम
उष्णतेच्या लाटेचा संपूर्ण आर्थिक स्थितीवरही परिणाम होते. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या कामावर देखील उष्णतेची लाट प्रभावी ठरते. यावेळी उत्तम काम करण्यास कर्मचारी सक्षम नसतात. उष्णतेच्या लाटेवेळी नागरिक घराबाहेर पडणे टाळतात. अशातच ऑनलाइन खरेदीमध्ये अत्याधिक वाढ झाल्याचे दिसून येते. नागपूर येथील गिफ्ट शॉपच्या मालकीण असलेल्या आरती यांनी म्हटले की, त्यांना उष्माघाताच्या समस्येचा सामना करावा लागला. यामुळे आठवडाभर गिफ्ट शॉप देखील बंद राहिले. उष्णतेच्या लाटेचा सर्व स्तरावर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने 1 मार्च ते 24 मे दरम्यान जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात 16,344 उष्माघाताची प्रकरणे समोर आली असून 60 जणांचा उष्णतेच्या लाटेत मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
आणखी वाचा :
पुढील तीन-चार तासात राज्यात मुसळधार पाऊस, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याला झोडपणार