स्विगी, बिगबास्केट आणि झोमॅटो सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे घरपोच मद्य वितरणास परवानगी मिळणार, सगळं प्रकरण घ्या जाणून

Published : Jul 16, 2024, 10:52 AM ISTUpdated : Jul 16, 2024, 11:07 AM IST
liquor sale Karnataka

सार

स्विगी, बिगबास्केट, झोमॅटो आणि इतर प्लॅटफॉर्मवरून आपण मद्य मागवू शकणार असून याबाबतच्या प्रोजेक्टवर काम सुरु आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला घर पोहोच दारू मिळाल्यास आश्चर्य वाटू शकणार नाही. 

नवी दिल्ली, कर्नाटक, हरियाणा, पंजाब, तामिळनाडू, गोवा आणि केरळ यांसारखी राज्ये स्विगी, बिगबास्केट, झोमॅटो आणि त्याच्या ब्लिंकिट क्विक-कॉमर्स आर्म सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे मद्याची होम डिलिव्हरी परवानगी देण्यासाठी पायलट प्रोजेक्ट्स शोधत आहेत, ज्याची सुरुवात कमी-अल्कोहोलने होणार आहे. बिअर, वाईन आणि लिकर यांसारखी पेये, घडामोडींची माहिती असलेले उद्योग अधिकारी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

घर पोहच मद्य मिळाल्यावर अपघातात होणार घट - 
घर पोहच मद्य मिळाल्यावर दारू पिऊन गाडी चालवण्याच्या प्रमाणात घट होणार असून त्यामुळे अपघात घट होणार आहे. पुणे येथे पोर्शे प्रकरण आणि मुंबई येथील शाह प्रकरणात या दोन गोष्टी प्रकर्षाने दिसून आल्या होत्या. घरी आणून मद्य दिल्यास बाहेर जाऊन दारू पिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटेल आणि लोकांचा जीव वाचू शकतो असे सांगितले जात आहे. 

स्विगी, झोमॅटो आणि बिगबास्केट या प्लॅटफॉर्मवरून आपण आधीही सर्व वस्तू मागू शकत होता पण आता ते प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. आपण या प्लॅटफॉर्मवरून दारू मागवल्यास आपल्याला डिलिव्हरी चार्ज द्यावा लागेल का, येथे आपण दुकानातून का ऑनलाईन खरेदी करू शकाल याबाबत मात्र आतापर्यंत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 
आणखी वाचा - 
नाशिकमधील अंजनेरी किल्ल्यावर अडकलेल्या 200 पर्यटकांचा वन विभागाकडून बचाव
Trainee IAS Pooja Khedkar News : प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरचे पिंपरी चिंचवड कनेक्शन आलं समोर, डाव्या गुडघ्यात 7 टक्के अपंगत्वाचे मिळवलं प्रमाणपत्र

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

Recommended Stories

Airport Privatisation: हुबळीसह देशातील ११ विमानतळ ५० वर्षांसाठी खाजगी हातात, डिसेंबरमध्ये निघणार टेंडर!
Vande Bharat Express: 'वंदे भारत'चा प्रवास खूप सुरक्षित वाटला; लिथुआनियाच्या तरुणीचा अनुभव व्हायरल