हिमाचल प्रदेशातील बंडखोर आमदार पोहोचले हरियाणात, विधानसभेच्या अध्यक्षांनी जारी केली कारणे दाखवा नोटीस

हिमाचाल प्रदेशातील राजकरणात वेगाने हालचाली होऊ लागल्या आहेत. काँग्रेसच सहा आमदार हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हरियाणातील पंचकूला येथे दाखल झाले आहेत. अशातच विधानसभेच्या अध्यक्षांनी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. 

Himachal Pradesh Congress MLA in Haryana :  हिमाचल प्रदेशात राजकरणात वेगाने हालचाली सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेससोबत बंडखोरी केलेले सहा आमदार हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शिमला येथून हरियाणा येथील पंचकूला (Panchkula) येथे दाखल झाले आहेत. खरंतर, सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग (Cross Voting) केल्याने काँग्रेसने त्यांना अयोग्य ठरवत याचिका दाखल केली होती. यामुळेच विधानसभेच्या अध्यक्षकांनी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. 

भाजपच्या बाजूने केले मतदान
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग केलेल्या काँग्रेसच्या सहा आमदारांनी एका हॉटेलमध्ये एक रात्र घालवल्यानंतर बुधवारी (28 फेब्रुवारी) हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हरियाणातील पंचकूला येथील ताऊ देवी लाल स्टेडिअम येथे दाखल झाले आहेत.

भाजपच्या संपर्कात काँग्रेसचे आमदार
भाजपच्या बाजूने मतदान केल्याने काँग्रेसचे सहा आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. या आमदारांना पुन्हा हिमाचल प्रदेशात जायचे नाही. यामुळे बंडखोर आमदार भाजपशासित हरियाणातील पंचकूला येथे पोहोचले आहेत. या आमदारांकडून हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांना पदावरुन हटवण्याची मागणी करत आहेत.

सुखविंदर सिंह सुक्खू यांनी अपहरण केल्याचा लावलाय आरोप
हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी आरोप लावला होता की, पक्षातील आमदारांचे अपहरण करण्यात आले आहे. पण आमदारांनी म्हटले की, "आम्ही फिरायला आलो आहोत. आमचे अपहरण झालेले नाही. आम्ही कुठेही जाऊ शकतो."

आणखी वाचा : 

'पैसा आणि ताकदीच्या जोरावर BJP कडून सत्ता पाडली जाऊ शकते', हिमाचलमधील राजकीय संकटावर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

DMK Government : इस्रोच्या जाहिरातीत द्रमुकने केली मोठी चूक, कामाचे लाटले खोटे श्रेय

PM Modi Maharashtra Visit : PM मोदींच्या हस्ते 9 कोटी शेतकरी कुटुंबांना 21 हजार कोटी रुपयांचे वितरण

Share this article