'पैसा आणि ताकदीच्या जोरावर BJP कडून सत्ता पाडली जाऊ शकते', हिमाचलमधील राजकीय संकटावर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

हिमाचल प्रदेशातील राजकरण सध्या तापले आहे. खरंतर, हिमाचल प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 40 पैकी सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग करत भाजप उमेदवार हर्ष महाजन यांना मत दिले.

Himachal Pradesh Political Crisis :  हिमाचल प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसच्या (Congress) सहा आमदारांसह एकूण नऊ आमदारांनी क्रॉस वोटिंग (Cross Voting) करण्यासह भाजपच्या (BJP) उमेदवाराला मत दिल्याने तेथील राजकरण तापले आहे. यावरच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हिमाचल प्रदेशातील क्रॉस वोटिंगवर संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. राऊत यांनी म्हटले की, “भाजप अजून काय करू शकते? भाजप पक्ष पैसा, ताकद आणि यंत्रणांच्या माध्यमातून असे करू शकते. तेच सरकार पाडू शकतात आणि आमदार खरेदी करू शकतात. क्रॉस वोटिंग हिमाचल आणि उत्तर प्रदेशातही झाले आहे.”

मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनाम्याचा प्रस्ताव
हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी पदाच्या राजनीम्याचा प्रस्ताव दिला आहे. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मंजूर झाल्यास आज बजेट मंजूर केले जाऊ शकत नाही. यामुळे सरकार समोर संविधानिक संकट निर्माण होऊ शकते.

हिमाचल सरकारमधील केंद्रीय मंत्री विक्रमादित्य सिंह यांचा राजीनामा
हिमाचलमध्ये क्रॉस वोटिंगवरुन राजकरण तापले आहेच. पण दुसऱ्या बाजूला वीरभद्र सिंह यांचे पुत्र आणि हिमाचल प्रदेशातील केंद्रीय मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देत विक्रमादित्य सिंह यांनी म्हटले की, "मी नेहमीच पक्षाची साथ दिली आहे...आज मला ऐवढेच म्हणायचे आहे की, सध्याच्या काळात माझे या सरकारमध्ये असणे योग्य नाही. मी असा निर्णय घेतला आहे की, मी मंत्रीमंडळातून राजीनामा देत आहे."

हिमाचलमधील राज्यसभेच्या जागांचे समीकरण
हिमाचलमध्ये राज्यसभेच्या 68 जागांपैकी काँग्रेसचे 40 आमदार होते. तीन अपक्ष आमदार असून त्यांचा सरकारला पाठिंबा होता. भाजपकडे 25 आमदार होते. हे समीकरण पाहिल्यास काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा विजय निश्चत होता. पण क्रॉस वोटिंगमुळे काँग्रेसला हिमाचलमध्ये पराभव स्विकारावा लागलाय. अशातच भाजपकडून निवडणुकीसाठी उतरवण्यात आलेले उमेदवार हर्ष महाजन यांचा विजय झाला आहे.

आणखी वाचा : 

'रुग्णालयांसाठी उपचार खर्चाचे किमान दर ठरवावेत, खासगी रुग्णालयांची मनमानी चालणार नाही', सुप्रीम कोर्टाचे सरकारला आदेश

PM Modi Tamil Nadu Visit : 'येथील मीडियाला प्रकल्पांबद्दल सांगायचंय, पण...' PM मोदींचा स्टॅलिन सरकारवर हल्लाबोल

देशात कोणत्याही वेळी लागू होऊ शकतो CAA , लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारचा मोठा निर्णय

 

Share this article