उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत मुंबईच्या 4 पर्यटकांचा मृत्यू, एकूण 5 मृत्युमुखी

Published : May 08, 2025, 10:19 AM ISTUpdated : May 08, 2025, 11:50 AM IST
helicopter accident utarkashi

सार

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात गुरुवारी सकाळी एक हेलिकॉप्टर अपघातात पाच पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर एक जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, मृत्युमुखी पडलेल्या पाचपैकी चार पर्यटक मुंबईचे आहेत तर एक प्रवासी आंध्र प्रदेशचा आहे.

उत्तरकाशी - उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात गुरुवारी सकाळी एक हेलिकॉप्टर अपघातात पाच पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर एक जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना देहराडूनहून हरसिलच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी हेलिकॉप्टरला घडली. दरम्यान, मृत्युमुखी पडलेल्या पाचपैकी चार पर्यटक मुंबईचे आहेत तर एक प्रवासी आंध्र प्रदेशचा आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये एकूण सहा प्रवासी होते. दुर्घटनास्थळी पोलिस, लष्कर, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि रुग्णवाहिका तत्काळ रवाना झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

प्रवास आणि दुर्घटनेचा तपशील

सकाळच्या सुमारास देहराडून येथून हरसिल हेलिपॅडकडे निघालेलं हे हेलिकॉप्टर उत्तरकाशीजवळ अचानक कोसळलं. घटनास्थळी धुकं आणि खराब हवामान असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र दुर्घटनेचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.

बचाव आणि शोधकार्य

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन दल (SDRF), पोलिस दल आणि लष्करी अधिकारी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. दुर्गम भाग असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत, पण प्रशासन पूर्ण ताकदीनिशी बचावकार्य करत आहे.

चौकशीची मागणी

दुर्घटनेनंतर पर्यटन विभाग आणि नागरी उड्डाण मंत्रालयाकडून अधिकृत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हेलिकॉप्टरच्या तांत्रिक दोषामुळे ही दुर्घटना झाली का, याचा शोध घेण्यात येणार आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी अशा प्रवासासाठी सुरक्षा नियम अधिक कठोर करण्याची मागणी केली आहे.

उत्तराखंडसारख्या डोंगराळ भागात हेलिकॉप्टर सेवा पर्यटकांसाठी मोठा आधार ठरते, पण अशा दुर्घटनांनी सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तांत्रिक तपासणी, प्रशिक्षण आणि हवामानाशी संबंधित सुरक्षाविषयक प्रक्रिया अधिक काटेकोरपणे राबवणं आवश्यक ठरेल.

मृतांची ओळख: 

कला सोनी (वय ६१) – मुंबई

विजया रेड्डी (वय ५७) – मुंबई

रुची अग्रवाल (वय ५६) – मुंबई

राधा अग्रवाल (वय ७९) – मुंबई

वेदवती कुमारी (वय ४८) – आंध्र प्रदेश

गंभीर जखमी: भास्कर (वय ५१) – आंध्र प्रदेश, सध्या गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

Recommended Stories

Vivekanand Patil Speech 10 Oct 2026 | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | Navnath ban | MPSC Pune Protest
MPSC Pune Protest | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यानेच मांडली व्यथा | State health Department