गुजरात समाचार मीडियाच्या संस्थेवर ईडीची छापेमारी, नक्की काय घडले? वाचा सविस्तर

Published : May 16, 2025, 12:24 PM IST
gujrat samachar

सार

गुजरातमधील प्रमुख वृत्तपत्र गुजरात समाचारचे मालक बाहुबली शांतिलाल शाह यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय ईडीने त्यांना मनी लॉन्ड्रिंच्या आरोपात ताब्यात घेतले आहे.

Gujrat : गुजरात समाचार मीडियाच्या संस्थेवर ईडीने छापा मारल्याचे प्रकरण समोर आले आहे. खरंतर, गुजरात समाचार राज्यात स्वतंत्र पत्रकारिकतेसाठी ओखळला जातो. याशिवाय वेळोवेळी सत्तेला वेळोवेळी कठोर शब्दांमध्ये सवाल विचारतो. पण ईडीने गुजरात समाचारवर केलेल्या कारवाईबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, गुजरात समाचार भारताच्या प्रेस फ्रीडम इंडेक्स 2024 मध्ये 180 देशांमध्ये 159 स्थानावर राहिला होता. अशातच गुजरातमधील ईडीने कारवाई केवळ मीडिया संस्थेपर्यंत मर्यादित ठेवलेली नाही. नोव्हेंबर, 2023 मध्ये विभागाच्या बिल्डर्स, फार्मा कंपन्यांनी आणि व्यापाऱ्यांच्या ठिकाणांवरही छापेमारी केली होती.

गुजरात समाचारावर झालेल्या या ताज्या कारवाईवरुन विरोधक आणि प्रेस स्वतंत्रेची बाजू घेणाऱ्या संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. यांचे असे म्हणणे आहे की, हे पाऊल सरकारवर टीका करणाऱ्या मीडिया संस्थांना दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी असू शकते. अद्याप ईडीकडून संस्थेवर करण्यात आलेल्या छापेमारीबद्दल अधिकृत विधान आलेले नाही. मीडिया आणि समाजाकडून या प्रकरणावर सरकारने पारदर्शकता आणि उत्तर मागत आहे.

PREV

Recommended Stories

आली लहर, केला कहर..! आमदारांना चक्क 200 टक्के पगारवाढ, 1.11 लाखांवरून थेट 3.45 लाख!
वंदे मातरम् एडिट केल्यानेच देशाची फाळणी? अमित शहांच्या विधानाने संसदेत वाद