Ahmedabad Plane Crash : क्रू मेम्बर्स आणि प्रवाशांची यादी आली समोर, जाणून घ्या या विमानात कोण कोण होते

Published : Jun 12, 2025, 04:31 PM ISTUpdated : Jun 12, 2025, 04:56 PM IST
Plane Crash

सार

या अपघातात एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलाइनर हे विमान संपूर्णपणे नष्ट झाले आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, या विमानात सुमारे २४२ प्रवासी आणि कर्मचारी सवार होते. यामध्ये २३० प्रवासी आणि १२ कर्मचारी सदस्यांचा समावेश होता. जाणून घ्या प्रवाशांची यादी...

अहमदाबाद (गुजरात) - गुरुवारी दुपारी एक मोठी आणि भीषण दुर्घटना घडली. एअर इंडिया फ्लाइट AI171, जे अहमदाबादहून लंडन गॅटविक विमानतळाकडे जात होते, ते सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच कोसळले. हे विमान थेट अहमदाबादच्या मेघनगर परिसरात कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलाइनर हे विमान संपूर्णपणे नष्ट झाले आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, या विमानात सुमारे २४२ प्रवासी आणि कर्मचारी सवार होते. यामध्ये २३० प्रवासी आणि १२ कर्मचारी सदस्यांचा समावेश होता. जाणून घ्या या विमानातील क्रू मेम्बर्स आणि प्रवाशांची यादी….

अपघातग्रस्त विमानातील चालक आणि केबिन क्रूची नावे समोर; अनुभवी वैमानिक आणि कर्मचारी होते उपस्थित

अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या आणि गुरुवारी दुपारी मेघनगर परिसरात अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडिया फ्लाइट AI171 या विमानातील चालकदल व केबिन क्रू यांची नावे आता समोर आली आहेत. २४२ प्रवाशांसह हे विमान कोसळले, ज्यात सर्वांच्या मृत्यूची शक्यता वर्तवली जात आहे.

चालकदलातील प्रमुख अधिकारी:

कॅप्टन सुमीत सभरवाल - मुख्य वैमानिक

फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर - सह वैमानिक

हे दोन्ही वैमानिक अत्यंत अनुभवी व प्रशिक्षित होते, आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय मार्गांवर अनेक उड्डाणे पार पाडली होती.

वरिष्ठ केबिन क्रू सदस्य:

श्रद्धा धवन

अपर्णा महाडिक

इतर केबिन क्रू सदस्य:

सायनीता चक्रवर्ती

नगंथोई कोंगब्रैलटपम शर्मा

दीपक पाठक

मैथिली पाटील

इर्फान शेख

लमनुथेम सिंगसोन

रोशनी सोंघरे राजेंद्र

मनीषा थापा

अपघातग्रस्त विमानात होते खालिल प्रवासी. वाचा त्यांची यादी-

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

हिवाळ्यात भारतातल्या या ठिकाणी द्या भेट, इथली सफारी देईल दुबईचा फील
आली लहर, केला कहर..! आमदारांना चक्क 200 टक्के पगारवाढ, 1.11 लाखांवरून थेट 3.45 लाख!