Ahmedabad Plane Crash गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा मृत्यू, भाजपच्या गुजरात प्रदेशाध्यक्षांनी दिली माहिती

Published : Jun 12, 2025, 03:07 PM ISTUpdated : Jun 12, 2025, 07:22 PM IST
vijay rupani

सार

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळाजवळ अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानात होते. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे.

अहमदाबाद - गुजरातच्या राजकारणात खळबळ उडवणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळाजवळ अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानात होते. त्यांचा बोर्डिंग पास समोर आला होता. त्यांचा या अपघातात मृत्यू झाल्याचे भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी सांगितले आहे.

हे विमान अहमदाबादहून लंडनकडे रवाना होत असताना, टेकऑफनंतर काही मिनिटांतच विमानतळाच्या सीमेलगत कोसळले. या अपघातात विमानात असलेले २४२ प्रवासी आणि कर्मचारी मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रवाशांमध्ये २३० प्रवासी आणि १२ कर्मचारी सदस्यांचा समावेश होता.

विजय रूपाणी यांचा मृत्यू

प्राप्त माहितीनुसार, विजय रूपाणी हेही या प्रवाशांमध्ये होते. त्यांचा या दुर्घटनेच मृत्यू झाल्याचे सी. आर. पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या जाण्याने भाजपचे मोठे नुकसान झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

रूपाणी यांचा राजकीय प्रवास

विजय रूपाणी यांनी ऑगस्ट २०१६ ते सप्टेंबर २०२१ दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यांनी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते सध्या सक्रिय राजकारणात फारसे सहभागी नव्हते, मात्र पक्षातील महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख कायम होती.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

हिवाळ्यात भारतातल्या या ठिकाणी द्या भेट, इथली सफारी देईल दुबईचा फील
आली लहर, केला कहर..! आमदारांना चक्क 200 टक्के पगारवाढ, 1.11 लाखांवरून थेट 3.45 लाख!