Gold-Silver Price Today : आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याचांदीच्या दरात घसरण, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट किंमती

Published : Apr 20, 2026, 11:00 AM IST
gold rate today india mcx gold price rise middle east tension us iran dollar impact silver fall

सार

Gold-Silver Price Today : अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर स्थिर असलेले सोने-चांदीचे दर आठवड्याच्या सुरुवातीलाच घसरले आहेत. MCX वर सोन्यात 1% तर चांदीत 1.55% घसरण झाली. जागतिक घडामोडी, डॉलरची मजबुती आणि क्रूडच्या किमती यामुळे बाजारात अस्थिरता वाढली असून पुढील आठवडा गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Gold-Silver Price Today : सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजारात हलकी घसरण पाहायला मिळाली. अक्षय तृतीयेच्या तुलनेत सोन्या-चांदीच्या दरात बदल दिसून आला असून खरेदी किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी अद्ययावत दर जाणून घेणे अत्यावश्यक ठरले आहे. जागतिक पातळीवरील आर्थिक आणि भूराजकीय घडामोडींचा थेट परिणाम मौल्यवान धातूंवर होताना दिसत आहे.

सोने-चांदीचे आजचे दर आणि MCX ट्रेंड

MCX वर जून महिन्याच्या सोन्याच्या वायद्यात सुमारे 1% घसरण नोंदवली गेली असून दर 10 ग्रॅमसाठी 1,53,030 रुपयांवर आले आहेत. तर मे महिन्याच्या चांदीच्या वायद्यात 1.55% घसरण होऊन दर किलोमागे 2,53,168 रुपयांवर पोहोचले. डॉलर मजबूत होणे आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने गुंतवणूकदारांनी नफा-वसुली केल्याचे दिसून येते.

बुलियन मार्केटमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,55,770 रुपये, 22 कॅरेट सोनं 1,42,790 रुपये आणि 18 कॅरेट सोनं 1,16,830 रुपयांवर आहे. अलीकडील घसरणीनंतर दर पुन्हा सावरण्याची चिन्हे दिसत आहेत.

जागतिक घडामोडींचा प्रभाव आणि बाजाराची दिशा

पश्चिम आशियातील तणाव आणि अमेरिका-इराणमधील संभाव्य घडामोडींचा थेट परिणाम सराफा बाजारावर होत आहे. 22 एप्रिलला संपणाऱ्या शस्त्रसंधीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर ETF गुंतवणुकीत वाढ झाली असून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये तेजी दिसून आली आहे.

कॉमेक्स बाजारात सोनं प्रति औंस 4,879.6 डॉलरवर पोहोचले असून चांदीही 81.84 डॉलरपर्यंत वाढली आहे. पुरवठ्यातील संभाव्य तुटवडा आणि औद्योगिक मागणीमुळे चांदीला अतिरिक्त आधार मिळत आहे.

गुंतवणूकदारांसाठी काय रणनीती असावी?

तज्ज्ञांच्या मते, सध्याची घसरण ही तात्पुरती असून दीर्घकालीन दृष्टीने सोनं-चांदीमध्ये सकारात्मक ट्रेंड कायम आहे. महागाईपासून संरक्षण आणि केंद्रीय बँकांची खरेदी यामुळे बाजाराचा पाया मजबूत राहणार आहे. त्यामुळे एकरकमी गुंतवणूक टाळून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित ठरेल.अल्पकालीन काळात डॉलरची हालचाल आणि अमेरिकेच्या आर्थिक आकडेवारीवर बाजाराची दिशा ठरणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगत निर्णय घेणे आवश्यक आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Bihar Boat Tragedy: बिहारमध्ये गंगेत बोट उलटली, १३ निष्पाप मुलांचा मृत्यू
Gold Reserves : जगात सर्वाधिक सोनं असलेल्या टॉप १० देशांची यादी, भारत कितव्या नंबरवर?