पोर्तुगीज 'काजू' आपल्या देशात आल्यावर मराठी, हिंदी आणि तेलगूमध्ये तो 'काजू' झाला. पण, प्रदेशानुसार याची वेगवेगळी नावं आहेत.
केरळमध्ये: 'परंगी अंडी' (Parangi Andi), ज्याचा अर्थ परदेशी किंवा पोर्तुगीज फळ असा होतो.
बंगालमध्ये: याला 'हिजली बदाम' (Hijli Badam) म्हटलं जायचं. पोर्तुगीजांनी ज्या बंदरावर पहिल्यांदा हे फळ लावलं, त्या बंदराच्या नावावरून हे नाव पडलं.
तामिळनाडूमध्ये: याला 'मुंदिरी' (Mundiri) म्हणतात.
फ्रेंचमध्ये: 'अकाजू' असं नाव होतं, जे नंतर इंग्रजीत 'कॅश्यू' (Cashew) झालं.
एकेकाळी गरिबांचं पीक... इतकं महागडं कसं झालं?
पहिली १०० वर्षं काजूकडे कोणी फारसं लक्ष दिलं नाही. ते पडीक जमिनीवर वाढायचं, म्हणून त्याला 'गरिबांचं पीक' मानलं जायचं. फक्त जमिनीची धूप थांबवण्यासाठी त्याचा वापर व्हायचा. काळ लोटत गेला तसं... या झाडाच्या फळांमधून मिळणाऱ्या बिया किती चविष्ट आहेत, हे जगाला समजलं. अशा प्रकारे जंगलात जन्माला आलेलं आणि आपली माती वाचवणारं हे फळ... आता जगभरातील अनेक प्रकारच्या मिठाई आणि पदार्थांमध्ये समाविष्ट झालं आहे. त्याने पदार्थांना चवीसोबतच... श्रीमंतीही दिली आहे. सुमारे ४५० वर्षांपूर्वी ब्राझीलमधून आपल्या देशात आलेली ही परदेशी वनस्पती आता... आपल्या संपूर्ण देशात रुजली आहे. सर्व प्रकारच्या पदार्थांचा ती एक भाग बनली आहे.