
नवी मुंबईत एका खाद्य कंपनीविरोधात ACP आणि FDAकडून कारवाई करण्यात आली. खाद्यपदार्थांच्या लेबल आणि एक्सपायरी डेटमध्ये कथित फेरफार केल्याच्या प्रकरणात अन्नसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी कंपनीच्या मालकांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. कारवाईसंदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त आणि ठाणे विभागाच्या FDA सहआयुक्तांनी माहिती दिली.