Devendra Fadnavis | आदिवासी भागात रोजगार वाढवणार

Devendra Fadnavis | आदिवासी भागात रोजगार वाढवणार

Published : Oct 01, 2026, 09:05 PM IST

जनजातीय भागातील गावांपर्यंत एकात्मिक विकास पोहोचवून स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करण्यावर भर असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रोजगार उपलब्ध झाल्यास स्थलांतर कमी होऊन शिक्षण आणि आरोग्यावर होणारा परिणामही कमी करता येईल, असे ते म्हणाले. केंद्राच्या योजनांमधून ₹70 हजार कोटींचा निधी उपलब्ध झाल्याचा उल्लेख करत महाराष्ट्र सरकारने यंदा जनजातीय क्षेत्रासाठी जवळपास ₹25 हजार कोटींची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. विविध योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष ठेवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.