Dhruv Rathee: 'व्होट चोर...': बंगळुरूमधील ध्रुव राठीचा आंदोलनातील व्हिडिओ व्हायरल

vivek panmand   | CMS
Published : Oct 08, 2026, 07:00 PM IST
Dhruv Rathee: 'व्होट चोर...': बंगळुरूमधील ध्रुव राठीचा आंदोलनातील व्हिडिओ व्हायरल

सार

युट्यूबर ध्रुव राठी आणि अभिनेता प्रकाश राज यांनी बंगळुरूच्या फ्रीडम पार्कमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनात सहभाग घेतला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात हे आंदोलन होतं. निवडणूक आयोगाच्या 'स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन' (SIR) प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आणि मतदानाच्या अधिकारावर गदा आणल्याचा आरोप या नेत्यांनी केला.

गुरुवारी (८ ऑक्टोबर) बंगळुरूचं फ्रीडम पार्क कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाचं मुख्य केंद्र बनलं होतं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात पुकारलेल्या या आंदोलनात युट्यूबर ध्रुव राठी आणि अभिनेता प्रकाश राज यांच्यासारख्या दिग्गजांनी हजेरी लावली.

ध्रुव राठीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की, "मला एक संदेश द्यायचा आहे." या व्हिडिओमध्ये आंदोलक 'व्होट चोर, व्होट चोर' अशा घोषणा देताना स्पष्ट ऐकू येत आहेत. व्हिडिओच्या शेवटी त्याने 'भारत माता की जय' अशी घोषणाही दिली.

व्हिडिओ पाहा

फ्रीडम पार्कमध्ये महिला आणि विद्यार्थ्यांसह अनेक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. 'एसआयआर' (SIR) प्रक्रिया रद्द करावी आणि ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे तिथलं वातावरण चांगलंच तापलं होतं.

आंदोलकांच्या हातातील पोस्टर्सवर "Error 404 - Name Not Found", "It's done bro, resign sir" आणि "Don't erase us, hear us" असे लक्षवेधी संदेश लिहिलेले होते.

निवडणूक आयोगाच्या 'एसआयआर' प्रक्रियेत अजिबात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व नसल्याचा आरोप ध्रुव राठीने केला. नागरी समाज गट आणि सीजेपीने आयोजित केलेल्या या आंदोलनाला संबोधित करताना तो म्हणाला, "मी इथे सत्ता बदलण्यासाठी आलेलो नाही."

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. त्यांच्यासोबत जमावाने 'व्होट चोर, व्होट चोर' अशा घोषणा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 'लोकशाहीची हत्या आणि मतांची चोरी' केल्याचा आरोप दिपके यांनी केला. जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

'स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन' अंतर्गत मतदारांची नावे वगळण्यामागे भाजप विरोधकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, पंतप्रधान मोदी आणि निवडणूक आयोगाने मिळून लोकशाहीची हत्या केल्याची टीकाही त्यांनी केली.

या आंदोलनात सहभागी झालेले अभिनेते आणि कार्यकर्ते प्रकाश राज यांनीही 'एसआयआर' प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली. हा केवळ मतं वगळण्याचा मुद्दा नसून नागरिकांच्या अधिकारांवर आणि सन्मानावर झालेला हल्ला आहे, असं ते म्हणाले. बंगळुरूच्या फ्रीडम पार्कमधील 'पीपल्स ट्रिब्युनल'ला संबोधित करताना त्यांनी 'एसआयआर' अंतर्गत होणाऱ्या मतदार पडताळणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या प्रक्रियेबद्दल चिंता वाटत असल्यानेच सीजेपीपासून आयसा (AISA) पर्यंतचे गट एकत्र आल्याचं त्यांनी सांगितलं. हा मुद्दा 'व्होट चोरी'पेक्षाही मोठा असून निवडणूक आयोगाने 'एसआयआर'च्या माध्यमातून संपूर्ण देशाचा अपमान केल्याचा घणाघात प्रकाश राज यांनी केला.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Okavango Delta: आफ्रिकेतील या दुर्मिळ पक्ष्याच्या सवयी बदलतायत, पर्यावरणासाठी धोक्याची घंटा?
INDIA Bloc Protest: राहुल आणि प्रियांका गांधींची लंच डिप्लोमसी, CEC विरोधात रणनीती