
बंगळुरु - सुजाता भट्ट म्हणून आलेल्या महिलेचे नाव सुजाता उपाध्याय असून त्या उडुपी जवळील परिका गावातील आहेत. तीन बहिणी असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म आणि संगोपन झाले. पण सुजाता भट्ट थेट विरेंद्र हेगडे आणि हर्षेंद्र हेगडे यांच्यावर आरोप का करत आहेत? याचा शोध घेतला असता रिअल इस्टेट व्यवसायातील एक वाद समोर येतो. पण सुजाता भट्ट यांच्याबद्दल त्यांच्या बहिणीच्या नवऱ्याने म्हणजेच महेश्वर यांनी दिलेली विशेष माहिती येथे आहे...
धर्मस्थला येथे शेकडो मृतदेह पुरण्यात आल्याची तक्रार एका अनोळखी व्यक्तीनं केली. याची गांभीर्यानं दखल न घेता सरकारनं एसआयटीची स्थापना केली. पण दुसरीकडे सुजाता भट्ट नावाच्या महिलेनं माझी मुलगी २२ वर्षांपूर्वी धर्मस्थळ येथे बेपत्ता झाली आहे, असं सांगितलं. कोणीतरी माझ्या मुलीचं अपहरण आणि खून केला असावा. आता शेकडो मृतदेहांच्या शोधात जर हाडे सापडली तर ती माझ्या डीएनएशी जुळवून पहा आणि तिचा सांगाडा मला द्या. त्या सांगाड्यावर धार्मिक विधी करायचे आहेत, अशी मागणी तिनं सरकारकडे केली आहे. पण ही सुजाता भट्ट कोण आहे? तिची पार्श्वभूमी काय? तिचं खरं नाव काय? तिचे कुटुंबीय कोण? ही माहिती तिच्या बहिणीच्या नवऱ्याने उघड केली आहे.
सुजाता भट्ट यांची बहीण वारिजा मध्यस्थ यांचे पती महेश्वर भट्ट म्हणाले, सुजाता भट्टची १९८८ पासून ओळख आहे. मी त्यांच्या बहिणीशी लग्न केल्यापासून त्यांची ओळख आहे. २००३ मध्ये माझी एमबीबीएस शिकणारी मुलगी धर्मस्थळ येथे बेपत्ता झाली आहे, अशी तक्रार सुजाता भट्ट यांनी दिली आहे. पण त्यांचं लग्नच झालेलं नव्हतं. अनैतिक संबंधातून त्या एकदा गर्भवती राहिल्या होत्या. पण आरूरू क्लिनिकमध्ये गर्भपात करून त्यांनी बाळाला सीता नदीत फेकून दिलं.
त्यानंतर उडुपी बसस्थानकावर अनैतिक व्यवहार करताना त्या पकडल्या गेल्या. तेव्हा त्यांना निट्टूर रिमांड होममध्ये ठेवलं होतं. तेथे एक आठवडा राहून त्या कंपाऊंडच्या भिंतीवरून पळून गेल्या. निट्टूर, उडुपी सोडून त्या पळून गेल्या. कितीही शोधलं तरी त्या सापडल्या नाहीत. कुठे गेल्या हे कुटुंबीयांनाही कळलं नाही. तीन वर्षांनी त्या बंगळुरूला आल्या. तेव्हा सुजाताची बहीण माझी पत्नी वारिजा म्हणाली, जे झालं ते झालं, आता बहिणीला नोकरी मिळवून द्या. तेव्हा मी आमच्याच शेखर हॉस्पिटलमध्ये त्यांना नोकरी मिळवून दिली. पण तेथेही एक आठवडा काम करून त्या पळून गेल्या.
पर्कळ जवळील परिकार हे त्यांचं कुटुंब आहे. त्यांच्या वडिलांना तीन मुली आहेत. सुजाता धाकटी आहे. त्यांना पाहिलं की कोणीही सहन करू शकत नाही. त्यांचा भाऊ म्हणाला होता की, सुजाताला घरात घेऊ नका, ती घराची बदनामी करणारे काम करते. पण बहीण वारिजा बंगळुरूला राहात होती. आम्ही कोर्टाजवळ एक दुकान चालवायचो. एकदा त्या आमच्या दुकानात आल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, भावा मी रिप्पनपेटे यांच्याशी लग्न केलं आहे. तुम्हाला काही लागलं तर सांगा, मी मदत करते.
तीन वर्षांनी पुन्हा त्या आमच्या घरी आल्या आणि म्हणाल्या, भावा मी एका जजच्या घरी काम करते. तुम्हाला काही मदत हवी का? हा चेक घ्या, पैसे घ्या. पण मी जजच्या घराचा चेक घेतला तर मला तुरुंगात टाकतील, या भीतीनं मी त्यांना मदत नको म्हणून सांगितलं आणि पुन्हा इथे येऊ नको म्हटलं. २००२-०३ मध्ये त्या मला भेटल्या नाहीत, असं महेश्वर यांनी सांगितलं.