Flight Seat Selection : विमान प्रवाशांना धक्का! 60% फ्री सीटचा नियम स्थगित, सीट निवडीसाठी पुन्हा शुल्क लागू

Published : Apr 03, 2026, 09:24 AM IST
Flight Seat Selection

सार

Flight Seat Selection : विमानातील 60% जागा मोफत देण्याचा DGCA चा प्रस्तावित नियम तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना सीट निवडीसाठी पुन्हा अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. विमान कंपन्यांच्या आर्थिक अडचणी आणि वाढत्या खर्चामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, इतर सुविधा मात्र कायम ठेवण्यात आल्या आहेत.

Flight Seat Selection : विमान प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विमानातील सीट निवडीसाठी अतिरिक्त शुल्क आकारण्याच्या नियमात बदल होणार होता, मात्र आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) 60% जागा विनामूल्य देण्याचा प्रस्तावित नियम तात्पुरता स्थगित केला आहे. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा आपल्या पसंतीची सीट निवडण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.

60% फ्री सीट नियमाला तात्पुरती स्थगिती

विमान कंपन्यांना दिलासा देत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (MoCA) 60% सीट्स मोफत देण्याचा आदेश पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवला आहे. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणेच सीट सिलेक्शनसाठी प्रवाशांना शुल्क भरावे लागेल. हा नियम 20 एप्रिलपासून लागू होणार होता, मात्र सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे तो पुढे ढकलण्यात आला आहे.

 नियम मागे घेण्यामागील कारणे

मध्यपूर्वेतील तणाव आणि एटीएफ (ATF) इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे विमान कंपन्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. इंडिगो, एअर इंडिया, स्पाईसजेट आणि अकासा एअर यांसारख्या कंपन्यांनी सरकारकडे याबाबत आक्षेप नोंदवले होते. सीट निवडीवरून मिळणारे उत्पन्न बंद झाल्यास तिकीट दर वाढवावे लागतील, असा दावा कंपन्यांनी केला. तसेच लवकर बुकिंग करणाऱ्यांकडून चांगल्या सीट्स घेतल्या जातील, ज्यामुळे इतर प्रवाशांना अडचणी येऊ शकतात.

प्रवाशांसाठी कोणत्या सुविधा कायम?

फ्री सीट नियम स्थगित केला असला तरी इतर काही महत्त्वाच्या सुविधा पूर्ववत राहणार आहेत. एकाच पीएनआरवरील प्रवाशांना एकत्र बसवण्याची सुविधा कायम राहील. सीट वाटपात पारदर्शकता राखली जाईल. तसेच संगीत वाद्ये, क्रीडा साहित्य आणि पाळीव प्राणी सोबत नेण्यास परवानगी असेल. याशिवाय सर्व शुल्कांची माहिती स्पष्टपणे देणे बंधनकारक असेल.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Robinhood Stock: ट्रुइस्टने वाढवले टार्गेट, वॉल स्ट्रीटवरही चर्चा
Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न! कालीघाटमधील धक्कादायक घटना