AI Job Loss : तो रेड्डी, ती शाझिया, AI मुळे 80 लाखांची नोकरी गेली, सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या प्रेमाचा करुण अंत

Published : Apr 02, 2026, 10:05 AM IST
Bengaluru Tech Couple Ends Life

सार

Bengaluru Tech Couple Ends Life : बंगळुरूत एका सॉफ्टवेअर इंजिनिअर दाम्पत्याने आत्महत्या केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे पतीची तब्बल ८० लाख रुपयांची नोकरी गेली. यामुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे दोघांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Bengaluru Tech Couple Ends Life : बंगळुरू शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका सॉफ्टवेअर इंजिनिअर दाम्पत्याने आत्महत्या केली असून, यामागे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे गेलेली नोकरी हे कारण असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ३२ वर्षीय भानू चंदर रेड्डी आणि त्याची पत्नी बीबी शाझिया सिराज (३१) अशी मृतांची नावं आहेत. हे दोघेही नुकतेच हैदराबादहून बंगळुरूत शिफ्ट झाले होते आणि कोथनूर परिसरातल्या एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. धक्कादायक म्हणजे, घरात पतीचा मृतदेह आढळल्यानंतर अवघ्या वीस मिनिटांत पत्नीनेही इमारतीवरून उडी मारून आपलं जीवन संपवलं.

मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास ३१ वर्षीय बीबी शाझिया नाईट शिफ्ट संपवून घरी परतली, तेव्हा तिचा पती भानू फोन उचलत नव्हता. तिने लगेच बिल्डिंगच्या सुरक्षा रक्षकांना बोलावलं आणि बेडरूमचा दरवाजा आतून बंद असल्याची माहिती दिली. सुरक्षा रक्षकांनी दरवाजा तोडला, तेव्हा भानूचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली. पतीचा मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या वीस मिनिटांतच, शाझियाने अपार्टमेंटच्या १८ व्या मजल्यावरून खाली उडी मारली आणि आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, AI मुळे भानूची तब्बल ८० लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी गेली होती. यामुळे तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. भानूने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्येही नोकरी गेल्यामुळे आलेल्या तणावाचा स्पष्ट उल्लेख आहे. रिपोर्टनुसार, या दाम्पत्याचं अमेरिकेत एक घर होतं आणि भानू तेलंगणामध्ये आपल्या कुटुंबासाठी दुसरं घरही बांधत होता. पण AI मुळे नोकरी जाताच त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. दुसरी नोकरी शोधण्यात अपयश आल्याने तो आणखीनच खचला होता.

सुमारे आठ महिन्यांपूर्वीच हे दाम्पत्य बंगळुरूला शिफ्ट झालं होतं, कारण शाझियाला IBM या मल्टिनॅशनल टेक्नॉलॉजी कंपनीत नोकरी मिळाली होती. भानूची अमेरिकेतील नोकरी सुटल्यानंतर तो भारतात परतला होता आणि नवीन नोकरीच्या शोधात होता. दोघांच्या लग्नाला अडीच वर्षं झाली होती, पण या लग्नाबद्दल फक्त भानूच्या कुटुंबीयांनाच माहिती होती. शाझियाने तिच्या घरी लग्नाबद्दल काहीही सांगितलेलं नव्हतं. नातेवाईकांपासून लग्न लपवण्यासाठीच ते आधी हैदराबादमध्ये आणि नंतर बंगळुरूला राहायला आले. ते थानिसांद्रा मेन रोडवरील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील टॉवर ६ च्या आठव्या मजल्यावर राहत होते.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Bihar Boat Tragedy: बिहारमध्ये गंगेत बोट उलटली, १३ निष्पाप मुलांचा मृत्यू
Gold Reserves : जगात सर्वाधिक सोनं असलेल्या टॉप १० देशांची यादी, भारत कितव्या नंबरवर?