Bomb Threat: बॉम्बच्या धमक्या देणारा म्हैसूरमधून गजाआड; दिल्ली पोलिसांची कारवाई!

Published : Mar 28, 2026, 12:49 PM IST
Delhi Police Arrest Mysuru Man for Sending Nationwide Hoax Bomb Emails

सार

Delhi Police Arrest Mysuru Man for Sending Nationwide Hoax Bomb Emails: देशभरातील सरकारी कार्यालये आणि शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या खोट्या धमक्या देणाऱ्या श्रीनिवास नावाच्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी म्हैसूरमध्ये एका मोठ्या कारवाईत अटक केली आहे. हा तरुण ई-मेलद्वारे या धमक्या पाठवत होता.

Delhi Police Arrest Mysuru Man for Sending Nationwide Hoax Bomb Emails म्हैसूर (28 मार्च): दिल्ली पोलिसांनी आज म्हैसूरमध्ये एक मोठी कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरातील सरकारी कार्यालये आणि शाळांना खोट्या बॉम्बस्फोटाच्या धमक्या देऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.

बृंदावन परिसरातून आरोपीला अटक:

पोलिसांनी म्हैसूरमधील प्रतिष्ठित अशा बृंदावन परिसरातील (Brindavan Layout) दुसऱ्या टप्प्यातील सहाव्या क्रॉसवर असलेल्या एका घरावर अचानक छापा टाकला. श्रीनिवास असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तो म्हैसूरमध्ये बसूनच देशभरात बॉम्बस्फोटाच्या धमक्यांचे ई-मेल पाठवत होता, अशी माहिती समोर आली आहे.

सरकारी कार्यालये होती टार्गेट:

अटक करण्यात आलेला आरोपी श्रीनिवास हा सरकारी कार्यालये, शाळा आणि न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे देत होता. त्याने दहशतवाद्याप्रमाणे अनेक ठिकाणी खोट्या बॉम्बची माहिती देऊन भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं. गेल्या एका महिन्यात त्याने अनेकदा असे मेसेज पाठवून सुरक्षा यंत्रणांची डोकेदुखी वाढवली होती.

इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त:

देशाच्या सुरक्षेसाठी आव्हान ठरलेलं हे प्रकरण सरकारनं गांभीर्यानं घेतलं होतं. या तरुणाला शोधून काढण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याच्या घरातून अनेक सिम कार्ड आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.

आरोपीला चौकशीसाठी दिल्लीला नेणार:

या कारवाईसाठी म्हैसूरच्या व्ही. व्ही. पुरम (V.V. Puram) पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिल्ली पोलिसांना मदत केली. आता अटक केलेल्या आरोपीला पुढील चौकशीसाठी दिल्ली पोलीस आपल्यासोबत दिल्लीला घेऊन जाणार आहेत.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Jantar Mantar Protest : १३ कोटी मतं गायब? 'मी जेलमध्ये जायला तयार' - अभिजित दीपके
Gold Rate Today : सोन्या-चांदीचे दर काय आहेत? जाणून घ्या मुंबई-दिल्लीसह तुमच्या शहरातील आजच्या किंमती