Aviation Safety: देशातली अर्धी विमानं 'आजारी', समितीच्या रिपोर्टने उडवली खळबळ!

Published : Mar 27, 2026, 07:24 PM IST
Parliamentary Report Reveals Technical Faults in Half of Indias Commercial Aircraft

सार

Parliamentary Report Reveals Technical Faults in Half of India's Commercial Aircraft: संसदीय समितीच्या एका रिपोर्टनुसार, देशातील जवळपास निम्म्या व्यावसायिक विमानांमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं समोर आलं आहे. तपासलेल्या ७५४ विमानांपैकी ३७७ विमानांमध्ये वारंवार समस्या आढळून आल्या. यात इंडिगो एअरलाइन्सच्या सर्वाधिक विमानांचा समावेश आहे.

Parliamentary Report Reveals Technical Faults in Half of India's Commercial Aircraft नवी दिल्ली: देशातील व्यावसायिक विमानसेवेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक मोठा खुलासा झाला आहे. संसदीय समितीच्या एका रिपोर्टनुसार, देशातील जवळपास निम्म्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं समोर आलं आहे. या रिपोर्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

रिपोर्टनुसार, तपासणी केलेल्या ७५४ विमानांपैकी ३७७ विमानांमध्ये वारंवार तांत्रिक समस्या येत असल्याचं नोंदवण्यात आलं आहे. याचाच अर्थ, जवळपास ५० टक्के विमानांमध्ये काही ना काही गडबड आहे.

सर्वात जास्त विमानं इंडिगो एअरलाइन्सची तपासण्यात आली आणि त्यांच्यातच सर्वाधिक बिघाडही आढळले. इंडिगोच्या तपासलेल्या ४०५ विमानांपैकी १४८ विमानांमध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर एअर इंडियाचा नंबर लागतो. एअर इंडियाच्या १६६ विमानांची तपासणी केली असता, त्यापैकी तब्बल १३७ विमानांमध्ये तांत्रिक समस्या आढळल्या. तर, एअर इंडिया एक्सप्रेसच्या १०१ पैकी ५४ विमानांमध्ये बिघाड असल्याचं स्पष्ट झालं.

याशिवाय, वैमानिकांचं अपुरं प्रशिक्षण आणि कर्मचाऱ्यांच्या ड्युटीच्या वेळेचं उल्लंघन यांसारख्या गंभीर समस्यांवरही समितीने बोट ठेवलं आहे. सुरक्षेच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याचा इशाराही या रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Fuel Prices:जगभरात दरवाढ, पण भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर; सरकारने उचलला भार
देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य! इंधन दर, लॉकडाऊन अफवा आणि कठोर इशारा