
Delhi Fire : दिल्लीतील तुगलकाबाद परिसरात गुरुवारी रात्री एका इमारतीमध्ये आग लागल्याच्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीत काहीजण अडकल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर तातडीने घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करत पाच जणांना सुखरुप आगीतून बाहेर काढण्यात आले. पण तीन जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, दिल्ली गेल्या काही दिवसांपासून घर, हॉटेलला आग लागल्याच्या घटना वारंवार होत आहेत. दिल्लीतील साकेत परिसरात सुरू असणाऱ्या हॉटेलच्या फ्लोरिशइनमध्ये आग लागल्याने 21 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये काही परदेशी नागरिकांचाही समावेश होता. आता तुगलकाबाद परिसरात भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे.
दिल्लीतील तुगलकाबाद परिसरात गुरुवारी रात्री एका 5 मजली इमारतीच्या बेसमेंटमध्ये आग लागली. इमारतीत उभ्या असलेल्या वाहनांमध्ये आग लागल्याने संपूर्ण इमारत धुराने भरली आणि अनेक लोक आत अडकले. दिल्लीतील अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन सुरू करत पाच जणांना सुखरूप बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले.
घटनास्थळावरुन समोर आलेल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतेय की, घरातील काही सामान पूर्णपणे आगीत जळाले आहे. पायऱ्यांवर आगीच्या धुराचे ठसे दिसत आहेत. मात्र दुर्घटनेत कोणत्या लोकांचा मृत्यू झाला याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.
#WATCH | Delhi: Three people died after a massive fire broke out in a building in Tughlakabad Extension area during the early hours of Friday. Visuals from the spot. https://t.co/KqSJGbqTEO pic.twitter.com/dY9aQl5rgE
— ANI (@ANI) June 12, 2026
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, रेस्क्यू करण्यात आलेल्या 8 जणांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. सफदरजंग रुग्णालयातील बर्न वॉर्डात भरती करण्यात आलेल्या 5 महिलांपैकी 2 महिलांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर अन्य तिघांवर उपचार सुरू आहेत. तसेच AIIMS ट्रॉमा सेंटरमध्ये भरती करण्यात आलेल्य तीन पैकी एका पुरुषाचा मृत्यू झाला असून तीन महिलांवर उपचार सुरू आहे.