Delhi Blast : दिल्लीतील स्फोटाच्या तपासाची धुरा मराठमोळे IPS विजय साखरे यांच्या हातात, जाणून घ्या त्यांच्या कामगिरीबद्दल सविस्तर

Published : Nov 13, 2025, 10:12 AM IST
Delhi Blast

सार

Delhi Blast : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासासाठी एनआयएने मराठमोळे आयपीएस अधिकारी विजय साखरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले आहे. 

Delhi Blast : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासाला आता गती मिळाली आहे. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने या प्रकरणासाठी 10 अधिकाऱ्यांचे विशेष पथक (Special Investigation Team) तयार केले आहे.या पथकाचे नेतृत्व मराठमोळे आयपीएस अधिकारी विजय साखरे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. साखरे यांच्या टीममध्ये एक पोलीस सहसंचालक, तीन पोलीस उपसंचालक आणि तीन पोलीस अधीक्षकांचा समावेश आहे.या पथकासमोर दिल्ली स्फोटाच्या मुळापर्यंत जाण्याचे आव्हान आहे.

मराठमोळे आयपीएस विजय साखरे

विजय साखरे हे 1996 च्या बॅचचे केरळ केडरचे आयपीएस अधिकारी असून, त्यांचा जन्म नागपूर येथे झाला आहे. त्यांनी यापूर्वी एनआयएमध्ये महानिरीक्षक (IG) म्हणून काम केले आहे. केरळमध्ये त्यांनी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ प्रशासकीय पदांवर काम करताना धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली आहे.सप्टेंबर 2025 मध्ये त्यांची एनआयएच्या अतिरिक्त महासंचालक (ADG) पदावर नियुक्ती झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली आता स्फोटाच्या तपासाला वेग येण्याची अपेक्षा आहे.

एनआयए, गुप्तचर विभाग आणि पोलिसांमध्ये समन्वय बैठक

दिल्ली स्फोटाच्या तपासात प्रगतीसाठी एनआयए महासंचालक सदानंद दाते आणि गुप्तचर विभाग प्रमुख यांच्या दरम्यान बुधवारी महत्त्वाची बैठक झाली. सूत्रांनुसार, एनआयएचे अधिकारी जयप्रकाश नारायण रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करतील.याशिवाय, जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि हरियाणा पोलिसांकडून “जैश-ए-महंमद मॉड्यूल”शी संबंधित सर्व पुरावे आणि दस्तऐवज ताब्यात घेण्यात येणार आहेत.

फरिदाबादमधील अल-फलाह विद्यापीठावर तपास यंत्रणांचा फोकस

तपासादरम्यान फरिदाबादमधील अल-फलाह विद्यापीठावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.या विद्यापीठाशी संबंधित तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. याच चौकशीचा भाग म्हणून तपास यंत्रणांनी आणखी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

५० हून अधिक लोकांची चौकशी सुरू

एनआयएने अल-फलाह विद्यापीठातील ५० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे.यामध्ये डॉ. मुझम्मिल, काही प्राध्यापक, विद्यार्थी, तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य यांचा समावेश आहे. या कारवाईदरम्यानसहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.याशिवाय सर्व चौकशीचा उद्देश म्हणजे दिल्ली स्फोटाच्या कटात कोणाचा सहभाग होता हे स्पष्ट करणे आहे. 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!