
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे गणित बदलताना दिसत आहे. भाजपचे नेते धैर्यशील मोहिते हे शरद पवार गटात प्रवेश करणार असून ते सोलापूर येथून लोकसभेला उभे राहणार असल्याचे चित्र आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे उपस्थित राहणार असून या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी धैर्यशील मोहिते आणि मोहिते पाटील कुटुंबीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थिती पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
धैर्यशील मोहिते पाटील तुतारी चिन्हावर लढणार निवडणूक -
धैर्यशील मोहिते पाटील यांचा शनिवारी वाढदिवस असल्यामुळे त्यांनी त्यांच्या भावना यावेळी व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, “वाढदिवस असल्याने माढा मतदारसंघातून सर्व मोहिते पाटील यांचेवर प्रेम करणारे कार्यकर्ते येत आहेत. आमच्या तीन पिढ्यांपासून आमच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हाती घेतली. भाजपने तिकीट नाकरल्यावर मी शांत बसलो होतो, मात्र कार्यकर्तेच बसू देत नव्हते. उद्या शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे हे घरी जेवायला येणार असून दुपारी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे. ”
धैर्यशील मोहिते पाटलांकडून दुष्काळग्रस्त भागाचा दौरा -
धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील काही गावांमध्ये जाऊन दुष्काळग्रस्त भागाचा आणि अवकाळी पाऊस पडून गेलेल्या गावांचा दौरा केला आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडून गेल्यामुळे झाडे पडली आहेत, अनेक घरांचे पत्रे उडून गेलेत तर काही ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. तलाठ्यांना पंचनामा करण्याचे आदेश देऊन वीज विभागातील अधिकाऱ्यांना वीज पूर्ववत करण्याचे आदेश दिले असल्याचे धैर्यशील मोहिते यांनी यावेळी सांगितलं आहे. धैर्यशील मोहिते यांचा वाढदिवस असूनही ते लोकांमध्ये जाऊन त्यांच्या नुकसानीची विचारपूस करून आले आहेत.
आणखी वाचा -
बोर्नव्हिटा शरीरासाठी घातक? सरकारने ई कॉमर्स कंपन्यांना बोर्नव्हिटाला हेल्थ ड्रिंक प्रकारातून काढण्याचे दिले आदेश
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील वेस्टफील्ड बॉडी जंक्शन शॉपिंग सेंटरमध्ये हल्लेखोराने लोकांवर केले चाकूने वार, घटनेचा व्हिडीओ झाला व्हायरल