Crude Oil Refining: आपण रोज वापरतो ते पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस हे सगळं एकाच कच्च्या तेलापासून (Crude Oil) मिळतं. ही प्रक्रिया नेमकी कशी चालते आणि या एकाच तेलातून आणखी काय काय गोष्टी बनवतात, ते आपण या गॅलरीतून जाणून घेऊया.
इराणमधील युद्धाच्या तणावामुळे कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस यांसारख्या आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कच्चं तेलच आधार आहे. या गॅलरीतून आपण समजून घेऊया की कच्चं तेल इतकं महत्त्वाचं का आहे आणि त्यापासून आपल्याला कोणकोणत्या वस्तू मिळतात.
26
अंशबष्पीकरण प्रक्रिया (Fractional Distillation)
कच्चं तेल म्हणजे अनेक प्रकारच्या हायड्रोकार्बन्सचं मिश्रण. यातून पेट्रोल, डिझेल आणि गॅस वेगळं करण्याच्या पद्धतीला 'फॅक्शनल डिस्टिलेशन' (Fractional Distillation) म्हणतात. ही प्रक्रिया एका मोठ्या टॉवरसारख्या भांड्यात होते. सगळ्यात आधी, परदेशातून आणलेलं कच्चं तेल एका मोठ्या भट्टीमध्ये टाकून सुमारे 400 डिग्री सेल्सिअस तापमानावर गरम करतात. या उष्णतेमुळे तेलाची वाफ बनते.
36
उत्पादने त्यांच्या बॉइलिंग पॉइंटनुसार मिळतात
गरम वाफ एका उंच टॉवरमध्ये सोडली जाते. या टॉवरचा खालचा भाग गरम असतो आणि वर जाताना तो थंड होत जातो. प्रत्येक इंधनाचा एक विशिष्ट बॉइलिंग पॉइंट (उत्कलन बिंदू) असतो. वाफ टॉवरमध्ये वर चढते, तेव्हा तिचं तापमान कमी होतं. जास्त बॉइलिंग पॉइंट असलेले डांबरासारखे पदार्थ द्रवरूप होऊन टॉवरच्या तळाशीच जमा होतात.
डिझेल आणि केरोसीनसारखे पदार्थ त्यांच्या बॉइलिंग पॉइंटला पोहोचल्यावर थंड होऊन द्रवात बदलतात आणि वेगळ्या ट्रेमध्ये जमा होतात. पेट्रोलची वाफ आणखी वर जाऊन थंड होते आणि मग द्रवरूप बनते. सर्वात कमी बॉइलिंग पॉइंट असलेले पेट्रोलियम वायू द्रवरूप न होता टॉवरच्या थेट वरच्या भागातून बाहेर पडतात.
56
कच्च्या तेलापासून मिळणारी उत्पादने
पहिल्या टप्प्यात मिळणारा LPG स्वयंपाकाचा गॅस म्हणून वापरतात. नंतर मिळणारे पेट्रोल कार आणि बाईक्ससाठी वापरले जाते. केरोसीन (रॉकेल) जेट इंधन आणि दिव्यांसाठी वापरतात. डिझेलचा उपयोग ट्रक, बस आणि रेल्वेमध्ये होतो. शेवटी उरलेलं डांबर (टार) रस्ते बांधण्यासाठी कामी येतं.
66
कच्चे तेल एक मौल्यवान वस्तू
अशाप्रकारे, फक्त तापमान बदलून एकाच कच्च्या तेलापासून वेगवेगळी इंधन मिळवली जातात. यामुळेच कच्चं तेल जगातल्या सर्वात मौल्यवान आणि सर्वाधिक मागणी असलेल्या वस्तूंपैकी एक आहे.