Central Govt Employee promotion: ८व्या वेतन आयोगाला 'FNPO' या पोस्टल कामगार संघटनेने दर ४ वर्षांनी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कर्मचाऱ्यांची दीर्घ प्रतीक्षा संपेल.
Central Govt Employee promotion: सरकारी नोकरदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नोकरीत प्रमोशनसाठी (Promotion) आता अनेक वर्षे वाट पाहावी लागणार नाही. आता दर ४ वर्षांनी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना प्रमोशन देण्याची मागणी पुढे आली आहे.
28
फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशन
नुकतंच ८व्या वेतन आयोगाला (8th Pay Commission) 'फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशन' (FNPO) या पोस्टल कामगार संघटनेने लेखी प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत आणि करिअरच्या प्रगतीत (Career Progression) मोठा बदल होईल, असे तज्ज्ञांना वाटते.
38
सध्याचा नियम विरुद्ध नवीन प्रस्ताव: काय बदलणार?
सध्या केंद्र सरकारच्या विभागांमध्ये प्रमोशनसाठी कोणतीही समान मुदत नाही. काही पदांवर पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी कर्मचाऱ्यांना ८ ते १२ वर्षे वाट पाहावी लागते. यामुळे दीर्घकाळ एकाच पदावर काम केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निराशा निर्माण होते आणि अनेक वरिष्ठ पदे रिक्त राहतात.
• मुदत निश्चिती: कोणत्याही पदासाठी प्रमोशनची किमान मुदत १ वर्ष आणि कमाल ४ वर्षे करण्याची मागणी करण्यात आली आहे. म्हणजेच, कोणत्याही कर्मचाऱ्याला प्रमोशनसाठी ४ वर्षांपेक्षा जास्त वाट पाहावी लागणार नाही.
58
समान धोरण
• समान रचना: सर्व केंद्र सरकारी विभागांमध्ये प्रमोशनचे समान धोरण (Uniform Promotion Framework) लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
68
रिक्त पदे भरणे आणि कर्मचाऱ्यांचे प्रमोशन
• नियमित आढावा: रिक्त पदे भरणे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत आहे की नाही, याचा नियमित आढावा (Periodic Review) घेण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
78
ही मागणी का करण्यात आली?
कर्मचारी संघटनांच्या मते, दीर्घकाळ प्रमोशन थांबल्याने कर्मचाऱ्यांचा कामाचा उत्साह कमी होत आहे. विशेषत: सुपरवायझरी आणि डायरेक्टर स्तरावरील अनेक महत्त्वाची पदे योग्य उमेदवाराअभावी किंवा नियमांच्या गुंतागुंतीमुळे रिक्त राहत आहेत, ज्यामुळे विभागाच्या सामान्य कामकाजात अडथळा येत आहे. दर ४ वर्षांनी प्रमोशन निश्चित झाल्यास कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रगतीबरोबरच प्रशासकीय गतीही वाढेल.
88
हा नियम कधीपासून लागू होऊ शकतो?
हा सध्या फक्त एक प्रस्ताव आहे, जो ८व्या वेतन आयोगाला (8th Pay Commission) सादर करण्यात आला आहे. आयोग सर्व बाबी तपासून आपल्या अंतिम शिफारशी केंद्र सरकारला सादर करेल. सरकारने या शिफारशी मंजूर केल्यावरच नवीन नियम लागू होईल. मात्र, ही बातमी उघड होताच लाखो सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नव्याने आशा निर्माण झाली आहे.
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.