आंतरजातीय विवाह किंवा धर्मांतर केल्यानंतरही जात बदलत नाही : अलाहाबाद हायकोर्ट

Published : Feb 14, 2026, 08:15 AM IST
Caste Does Not Change After Inter Caste Marriage or Conversion

सार

Caste Does Not Change After Inter Caste Marriage or Conversion : 'आंतरजातीय विवाह किंवा धर्मांतरानंतरही जन्माने मिळालेली जात बदलत नाही,' असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

Caste Does Not Change After Inter Caste Marriage or Conversion : 'आंतरजातीय विवाह किंवा धर्मांतरानंतरही जन्माने मिळालेली जात बदलत नाही,' असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. जाट समाजातील व्यक्तीशी लग्न केलेल्या अनुसूचित जातीच्या महिलेने तिच्या जातीच्या आधारावर अत्याचार होत असल्याची तक्रार दिली होती, त्यावरील सुनावणीदरम्यान कोर्टाने हे स्पष्ट केले.

प्रकरण काय आहे?

'मी अनुसूचित जातीची असल्याने दिनेशसह ९ जणांनी माझ्यावर अत्याचार केला, जातीवरून शिवीगाळ केली आणि माझ्यासह ३ जण जखमी झालो,' अशी तक्रार एका महिलेने दिली होती. या प्रकरणी अलिगढच्या विशेष न्यायाधीशांनी २७ जुलै २०२२ रोजी आरोपींना समन्स बजावले होते. याला आव्हान देत दिनेशने अलाहाबाद न्यायालयात धाव घेतली होती आणि 'लग्नानंतर महिला पतीच्या जातीची होते' असा युक्तिवाद केला होता.

जन्माने मिळालेली जात बदलत नाही

न्या. अनिल कुमार यांच्या खंडपीठाने हा युक्तिवाद फेटाळून लावत, 'फक्त लग्न केल्याने किंवा धर्मांतर केल्याने जन्माने मिळालेली जात बदलत नाही,' असे स्पष्ट केले.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Vivekanand Patil Speech 10 Oct 2026 | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | Navnath ban | MPSC Pune Protest
MPSC Pune Protest | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यानेच मांडली व्यथा | State health Department