Budget 2024 : आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार अंतरिम अर्थसंकल्प, 11 वाजता सुरू होणार वाचन

नव्या संसदेत अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. बुधवारी (31 जानेवारी) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभा आणि लोकसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले. आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Chanda Mandavkar | Published : Feb 1, 2024 4:47 AM IST / Updated: Feb 01 2024, 10:20 AM IST

Interim Budget 2024 :  नव्या संसदेत आज (1 फेब्रुवारी) लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या 2.0 चा अखेरचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आपल्या कार्यकाळात सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. खरंतर आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

अंतरिम अर्थसंकल्पात देशाची अर्थव्यवस्था, शेतकरी, महिला वर्ग आणि तरुणांना मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. सकाळी 11 वाजता अंतरिम अर्थसंकल्पाच्या वाचनाला निर्मला सीतारमण सुरुवात करणार आहेत. यावेळी देशाचा संपूर्ण आर्थिक लेखाजोखा जनतेसमोर मांडला जाणार आहे. अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना सर्व खासदार संसदेच्या सदनात उपस्थितीत असणार आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण राष्ट्रपतींची घेणार भेट 
अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थमंत्रालयात पोहोचल्या आहेत. येथे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आधीच पोहोचले होते. अर्थमंत्रालयातून निघाल्यानंतर निर्मला सीतारमण आणि राज्य पंकज चौधरी यांच्या संपूर्ण अर्थसंकल्पाच्या टीमसोबत औपचारिक रुपात फोटो सेशन केले. यानंतर निर्मला सीतारमण राष्ट्रपती भवनाकडे निघाल्या आहेत. राष्ट्रपतींची अंतरिम अर्थसंकल्पाला मंजूरी मिळाल्यानंतर तो संसदेत सादर केला जाणार आहे.

कुठे पाहू शकता अर्थसंकल्पाचे लाइव्ह प्रक्षेपण
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे लाइव्ह प्रक्षेपण तुम्हाला पाहाता येणार आहे. अंतरिम अर्थसंकल्पाचे लाइव्ह प्रक्षेपण तुम्ही दूरदर्शनव्यतिरिक्त संसदेच्या टीव्हीवर, PIB च्या सोशल प्लॅटफॉर्म आणि अर्थमंत्रालयाच्या YouTube चॅनलवर पाहू शकता.

दरम्यान, यंदाचा अर्थसंकल्प खास असणार आहे. कारण मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प असणार आहे. यानंतर नवे सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

आणखी वाचा : 

President Droupadi Murmu's Speech : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संसदेतील अधिवेशनातील वाचा महत्त्वाचे मुद्दे

स्वस्त होणार स्मार्टफोन, अर्थसंकल्पापूर्वी सरकारचे नागरिकांना गिफ्ट

Budget 2024 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचे लक्ष, कृषी क्षेत्रासाठी या घोषणेची शक्यता

 

Read more Articles on
Share this article