बीएआरस नेत्या के कविता यांची ईडी कोठडी संपली, आता 9 एप्रिलपर्यंत तुरुंगात

Published : Mar 26, 2024, 01:51 PM IST
MLC Kavita

सार

देशात लोकसभा निवडणुकीच्या आधी महत्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. बीआरएसच्या एमएलसी के कविता यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

देशात लोकसभा निवडणुकीच्या आधी महत्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. बीआरएसच्या एमएलसी के कविता यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. के कविता यांच्या अतिरिक्त पोलीस कोठडीची मागणी करण्यात आल्यानंतर त्यांना ही सुनावण्यात आली आहे. त्यांच्या कोठडीत नऊ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांना बाहेर सोडल्यानंतर त्या पुराव्यानिशी छेडछाड करू शकतात असा अआरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. 

कविता यांना सोळा मार्च रोजी अंमलबजावणी संचानालयाच्या कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या कोठडीत तेवीस मार्च पर्यंत वाढ करण्यात आली होती. परत त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यांना दिल्ली दारू घोटाळ्याप्रसंगी गुन्हेगार ठरवण्यात आले आहे. त्या तेलंगणामधील बीएआरस या स्थानिक राजकीय पक्षाच्या नेत्या आहेत. 

आता के कविता यांना नऊ एप्रिल रोजी अकरा वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे. के कविता यांच्या अटकेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर दिल्लीमधील दारू घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. 
आणखी वाचा - 
होळीच्या दिवशी दिल्लीत नवऱ्याने चिरला बायकोचा गळा, पोलीस घटनास्थळी पोहचल्यावर बायको दिसली रक्ताच्या थारोळ्यात
Lok Sabha Election : राजस्थानमधील या चार महिला उमेदवारांवर असणार नजर, पराभव होऊनही पक्षाने दिलेय तिकीट

PREV

Recommended Stories

इंडिगो संकटात सरकारचा मोठा निर्णय! विमान कंपन्यांना तातडीचे आदेश; तिकीट दरांची मनमानी आता थांबणार!
आज 6 डिसेंबर, याच दिवशी बाबरी पाडली, TMC MLA Humayun Kabir आज बाबरी मशिदीची करणार पायाभरणी!