BREAKING : देशात मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण आढळला, आरोग्य यंत्रणा सतर्क

नुकताच एका देशातून प्रवास करून आलेल्या एका तरुण पुरुषाला Mpox (मंकीपॉक्स) चा संसर्ग झाल्याची शक्यता आहे. रुग्णाला आयसोलेट केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. संसर्गाची पुष्टी करण्यासाठी चाचण्या सुरू आहेत आणि संपर्क शोधण्याचे काम सुरू आहे.

Rameshwar Gavhane | Published : Sep 8, 2024 11:05 AM IST / Updated: Sep 08 2024, 04:46 PM IST

देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मंकीपॉक्सचा धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. देशात मंकीपॉक्स विषाणूचा पहिला रुग्ण सापडला आहे. जगभरात अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा शिरकाव झाला आहे. त्यानंतर आता भारतात मंकीपॉक्स विषाणूचा रुग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार, आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी आजारी लोकांसोबत जवळचा संपर्क टाळावा. याशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी मृत किंवा जिवंत प्राण्यांसोबतचा जवळचा संपर्कही टाळावा.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

  1. आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी आजारी व्यक्तीसोबतचा संपर्क टाळावा. त्वचेशी आणि खाजगी भागांतील जखमा किंवा आजार असलेल्या व्यक्तीशीही संपर्क टाळावा.

2. आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी कोणत्याही जिवंत किंवा मृत सस्त प्राण्यासोबत संपर्क टाळावा. यामध्ये उंदीर, खार, माकड या प्राण्यांसोबत संपर्क टाळावा.

3. जंगली प्राण्यांचे मांस खाणं टाळा.

4. कोणत्याही आजारी व्यक्तीच्या वापरातील वस्तू वापरू नका.

Share this article