हैदराबाद येथे भाजपच्या उमेदवार माधवी लथा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.
हैदराबाद येथून ओवेसी यांच्या विरोधात फायरब्रॅन्ड नेत्या असणाऱ्या कोम्पेला माधवी लथा यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर आलेल्या मुस्लिम महिलांना त्यांचा बुरखा बाजूला काढण्यास लावला होता. त्यांनी ओळखपत्रावरील निवडणूक करणारी व्यक्ती तीच आहे ना हे तपासण्यासाठी बुरखा बाजूला काढला होता असे सांगितले आहे.
माधवी लथा यांनी काय केले -
त्यांनी अशा प्रकारचे कृत्य केल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलकपेठ येथील पोलीस ठाण्यात माधवी लथा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे. त्या चार वेळा खासदार राहिलेल्या ओवेसी यांच्या विरोधात निवडणूक लढवत असून ही निवडणूक खऱ्या अर्थाने येथून तुल्यबळ होणार असल्याचे दिसून येत आहे.
त्या काय म्हणाल्या -
मतदार यादीमध्ये तफावत असल्याचा आरोप यावेळी भाजप उमेदवाराने केला आहे. भाजप उमेदवार माधवी लथा यांनी बोलताना म्हटले आहे की मतदान केंद्रावर असलेले पोलीस अधिकारी सुस्तावलेले दिसत आहेत, ते काहीही तपासात नसल्याचे दिसून आले आहे. जेष्ठ मतदारांचे मतदार यादीत नाव नसल्यामुळे ते निघून जात आहेत. माधवी लथा यांचा मुस्लिम महिलांशी बोलताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा -
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानात देशातील 'या' व्हीआयपी नेत्यांचे भवितव्य पणाला लागले, ओवेसींपासून ते अखिलेशपर्यंत यादी मोठी
दिल्लीतील 2 मोठ्या रुग्णालयांना बॉम्बने उडविण्याची धमकी, सर्च ऑपरेशन सुरू